मुंबई : इटलीत आपल्या कुटुंबीयांच्या आणि अतिशय जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपिका आणि रणवीरने एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्या दोघांनीही लग्नगाठ बांधली आणि प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य गाजवलं.
सर्वांच्याच लाडक्या जोडीने परदेशात लग्नगाठ बांधली असली तरीही भारतात आणि साऱ्या विश्वात असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी जणू आपण, रणवीर-दीपिकाच्या लग्नाच उपस्थितच आहोत, अशा उत्साहात कल्ला करण्यास सुरुवात केली.
सहजीवनाच्या नव्या प्रवास करणाऱ्या या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही एकमेकांचा तिचक्याच आनंदाच स्वीकार केल्याचं पाहायला मिळालं.
दीपिकाच्या भावंडांमध्ये रणवीरचं मोठ्या दणक्यात स्वागत करण्यात आलं. अमित पदुकोणने ट्विटर अकाऊंटवरुन एक GIF पोस्ट करत पदुकोण कुटुंबाच्या जावयाचं स्वागत केलं.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या GIF मध्ये दीपिका आणि रणवीरच्या 'राम-लीला' या चित्रपटातील काही सेकंदांचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. मुळात हा चित्रपट त्या दोघांच्या प्रेमाच्या प्रवासात तितकाच महत्त्वाचा आहे ही बाबही तितकीच महत्त्वाची.
Magical week, steeped purely in love. Fairy-tale union of the two most kind, beautiful souls. @RanveerOfficial Welcome to the fam! you've dethroned me as filmiest, but I'll cope @deepikapadukone Never seen you happier; you deserve no less! #ladkiwale #DeepVeerKiShaadi pic.twitter.com/RaT86A9QXw
— Amit Padukone (@APadukone) November 14, 2018
एक भाऊ म्हणून त्याने आपल्या बहिणीप्रतीच्या भावनांना या ट्विटमधून वाट मोकळी करुन दिली. दीपिकाच्या वाट्याला आनंद पाहून प्रत्येकालाच त्याचा हेवा वाटत आहे. तिचे कुटुंबीयसुद्धा आनंदाच्या या क्षणांना आपल्या मनात कायमचं साठवून ठेवत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
#DeepikaRanveerWedding