मुंबई : कलासृष्टीचं राजकारणाशी एक वेगळंच नातं आहे ही बाब आपण जाणतो. हे नातं खरंतर शब्दांत मांडणंही कठिण. कारण, इथे रागरुसवे आहेत, भाडणं आहेत, टोकाचे मतभेद आहेत आणि हो... घट्ट मैत्रीही आहेच. असंच एक मैत्रीचं नातं सध्या अनेकाचं लक्ष वेधत आहे. राजकारणातील तरुण पिढी आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीची ही मैत्री.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमातील मुलाखतीत अभिनेत्री दिशा पटनीविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. अभिनेतचा टायगर श्रॉफ याची दिशा तथाकथित प्रेयसी. पण, गेल्या काही दिवसांपासून मात्र तिचं नाव आदित्य यांच्यासोबतही चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या दोघांचा वाढदिवसही एकाच दिवशी म्हणजे १३ जूनला असतो.
आदित्य आणि दिशाचा वाढदिवस एकत्र येणं हा त्यांच्या मैत्रीच्या नात्यातील एक भन्नाट योगायोग ठरत आहे. एकिकडे दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या नजरेस आदित्य ठाकरे यांच्याही वाढदिवसाची बाब पडत असल्याचं पाहता पुन्हा त्यांच्याच चर्चा रंगत आहेत.
काही दिवसांपूर्वीच दिशा आणि आदित्य यांना मुंबईतील हॉटेलबाहेर एकत्र पाहिलं गेलं होतं. ज्यानंतर माध्यमांमध्ये त्याच्या मैत्रीच्या अनेक चर्चांनी जोर धरला, त्यांच्या या भेटीचे फोटोही व्हायरल झाले. आदित्य यांनी याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, दिशाने मात्र तुम्ही कोणा मित्रासोबत लंच किंवा डिनरसाठी नाही का जात? मी मैत्रीत कधीच मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव केला नाही, असं तिने स्पष्ट केलं. दिशाने आदित्य यांच्यासोबचं मैत्रीचं नातं सर्वांसमोर ठेवलं असलं तरीही आता एकाच दिवशी वाढदिवस असण्याचा योगायोगही अनेकांनाच चर्चेला नवा विषय देत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.