मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही कायमच तिच्या लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते. सौंदर्यासोबतच फिटनेसच्या बाबतीतही सजग असणाऱ्या दिशाचा प्रत्येक लूक चर्चेचा विषय ठरतो. मुख्य म्हणजे फक्त चाहतेच नाहीत, तर तिचा कथित प्रियकर टायगर श्रॉफही आपल्या गर्लफ्रेंडच्या अदा पाहून अवाक् होतो. (Disha Patani)
दिशानं नुकताच शेअर केलेला फोटो पाहून याचा सहज अंदाज लावता येत आहे.
बिकीनी लूकमधील फोटो शेअर करत दिशानं सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला.
समुद्राच्या पाण्यात डुंबून बाहेर आलेल्या दिशाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटला.
खुद्द टायगरही तिच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वत:ला थांबवू शकला नाही.
दिशाच्या पिंक बिकीनी लूकला पाहून त्यानं धगधगत्या आगीचे इमोटीकॉन्स कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केले.
पाठीवर असणारे ओले, मोकळे केस, एका बाजूनं दिसणारा दिशाचा चेहरा आणि तिचा कमनीय बांधा या सर्व गोष्टी तिच्या या एका फोटोमध्ये पाहायला मिळाल्या.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये ती समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसत आहे.
एखादी जलपरी ज्याप्रमाणं पाण्यातून बाहेर येताना तिच्या सौंदर्याची लकाकी सर्वत्र पाहायला मिळते, तसंच काहीसं रुप दिशाच्या या लूकमध्ये दिसून आलं.
तिचे हे फोटो पाहता सध्या ती काही निवांत क्षणांचा आस्वाद घेत असल्याचं स्पष्ट होत आहे.
आगामी चित्रपटाचं काम पूर्ण....
हल्लीच दिशानं 'योद्धा' या तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. राशी खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत ती या चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहे.
दिशाचा हा आगामी चित्रपट केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो याचीच उत्सुकता सध्या लागून राहिली आहे.