close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Cartwheel मारणाऱ्या दिशा पटनीचा व्हिडिओ पाहिला?

अगदी सहजपणे तिने ही उडी मारली 

Updated: Jun 26, 2019, 12:22 PM IST
Cartwheel मारणाऱ्या दिशा पटनीचा व्हिडिओ पाहिला?

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या भारत या चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी दिशा पटनी तिच्या रुपाने कायमच चाहत्यांना भुरळ पाडते. इतकच नव्हे, तर दिशाचं एकंदर वावरणं आणि प्रचंड आत्मविश्वास असणारं तिचं व्यक्तीमत्वं पाहता तिचा अंदाज कायमच चाहते आणि इतरही सेलिब्रिटींची मनं जिंकून जातो. अशी ही अभिनेत्री सध्या मात्र एका व्हिडिओमुळे बरीच चर्चेत आहे. 

इन्स्टाग्रामवर दिशाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती कार्टव्हील करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनंतर आपण प्रशिक्षकांच्या मदतीने असं काहीतरी करत असल्याचं तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. शरीराचा तोल सांभाळत अतिशय सुरेखपणे दिशा सर्व भार हातांवर झेलत हे कार्टव्हील करण्यातक यशस्वी झाली. यामध्ये अर्थातच प्रशिक्षकांचीही साथ तिला लाभली. 

तिचा हा व्हिडिओ आणि एकंदरच शारीरिक सुदृढता पाहून ही अभिनेत्री फक्त सौंदर्यासाठीच आदर्श ठरत नसून, व्यायाम, शारीरिक सुदृढता यासाठीही अनेकांनाच आदर्शस्थान आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

व्यायामाशी संबंधित एखादा व्हिडिओ पोस्ट करण्याची दिशाची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अशा पद्धतीचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते. ज्यामध्येही तिने अनेकांची मनं जिंकली होती. दिशा काही दिवसांपूर्वी सलमानसोबत 'भारत' या चित्रपटात झळकली होती. ज्यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे तिच्या खासगी आयुष्याची. गेल्या बऱ्याच काळापासून, अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या तिच्या बहुचर्चित नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. बी- टाऊनमध्ये होणाऱ्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चांमध्ये सध्या याच विषयावर अनेकांच्या नजरा रोखल्या आहेत.