close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूड अभिनेत्रीचा जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल

'गेम ओव्हर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 

Updated: Jun 10, 2019, 08:30 AM IST
बॉलिवूड अभिनेत्रीचा जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल

मुंबई : नेहमीच चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सध्या मात्र एका वेगळ्याच आणि चिंतातूर करणाऱ्या फोटोंच्या माध्यमातून सर्वांसमोर आली आहे. तिचे जखमी अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही अभिनेत्री आहे, तापसी पन्नू. तापसीला नेमकं झालं तरी काय, असाच प्रश्न चाहत्यांच्याही मनात घर करत आहे. पण, यात चिंतेचं कारणच नाही.

'गेम ओव्हर' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 'पिंक', 'मनमर्जियाँ', 'मुल्क' यांसारख्या आव्हानात्मक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी तापसी व्हिलचेअरवर बसल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. खुद्द तापसीने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहेत. 

तापसीने ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'थंड बर्फाच्या डोंगरावर चक्क २५ दिवस शिफॉनच्या साडीत काम करणं फारच कठीण आहे. म्हणून, मी या भूमिकेची निवड केली' असे लिहिले आहे. तिच्या आगामी चित्रपटात देखील ती अव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. 

'गेम ओव्हर' चित्रपटात तापसी एका व्हिडिओ प्रोग्रामरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या पोस्टवरून सिद्ध होत आहे की, चित्रपटात तापसी अत्यंत प्रभावी आणि कथानकाच्याच अनुषंगाने एक वेगळी आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे.  

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला चाहत्यांकडून प्रचंड दाद मिळली. आता पर्यंत तब्बल ५ कोटींपेक्षा जास्त चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला. १४ जून रोजी 'गेम ओव्हर' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.