....म्हणून व्हायरल होत आहेत जान्हवी कपूरच्या जुन्या फोनमधील फोटो

फक्त फोटोच नव्हे, तर व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत   

Updated: Jun 5, 2020, 11:32 AM IST
....म्हणून व्हायरल होत आहेत जान्हवी कपूरच्या जुन्या फोनमधील फोटो
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Coronavirus कोरोना व्हाययरसमुळं सध्या सर्वजण लॉकडाऊनच्या दिवसांचा अनुभव घेत असले तरीही आता या दिवसांमध्येही स्वत:ला रुळवण्याचे बहुविध मार्ग प्रत्येकानं शोधले आहेत. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे राहिलेले नाहीत. जवळच्या व्यक्तींशी व्हर्च्युअली अर्थान व्हिडिओ कॉल, चॅट अशा माध्यमांतून जोडलं जाण्यापासून ते अगदी जुने बैठे खेळ खेळत जुन्या फोटोंमध्ये रमण्यात अनेकांचे दिवस व्यतीत होत आहेत. 

अभिनेत्री जान्हवी कपूरही सध्या अशाच क्षणांचा अनुभव घेत आहे. नुकतेच जान्हवीचे काही जुने फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहेत. तिचे हे फोटो जुन्या फोनमध्ये सापडले आहेत. फक्त फोटोच नव्हे, तर जान्हवीचे काही व्हिडिओसुद्धा पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तिचं नृत्यकौशल्य पाहण्याजोगं आहे. 

खुद्द जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. ज्या फोटोंमध्ये ती कुठं मित्रमैत्रीणंशी मजा करताना दिसते, कुठं नृत्य करताना, कुठं आईवडिलांच्या आठवणींत रमताना.

 
 
 
 

Found my old phone, found some fun memz

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या जान्हवीच्या या अदा आणि कुटुंबाप्रती असणारी तिची ओढ पुन्हा एकदा या फोटोंच्या निमित्तानं प्रेक्षकांना आणि अर्थातच तिच्या फॉलोअर्सना पाहण्याची संधी मिळाली आहे. एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येत असतानाच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी तिच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका अगदी पारंगतपणे निभावत आहे. मग ती भूमिका रुपेरी पडद्यावर असो किंवा खऱ्या आयुष्यात. जान्हवी तिचं बेअरिंग काही सोडत नाही, हेच खरं.