close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...

एका समारंभाला तिने हजेरी लावली होती 

Updated: Aug 25, 2019, 09:03 AM IST
अरेरे, एका चुकीमुळे नेटकरी जान्हवीला म्हणाले...

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने फार कमी वेळात हिंदी कलाविश्वात तिचं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. जान्हवीचा हाच अंदाज पाहता येत्या काळात अग्रगणी अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव असल्याचं अनेक बॉलिवूड तज्ज्ञांचं म्हणणंही आहे. पण, कारकिर्दीच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असणारी जान्हवी सध्या मात्र तिच्या एका लहानशा चुकीमुळे अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. 

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होणं ही काही नवी गोष्ट नाही. विविध कार्यक्रम, समारंभ किंवा चित्रीकरणाच्या निमित्ताने उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटी मंडळींवर कायमच छायाचित्रकारांच्या नजरा असतात. अर्थात यावेळी छायाचित्रकारांनी जान्हवीची उपस्थिती असणाऱ्या एका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये तिने हातात असणारं पुस्तक उलटं पकडलं होतं. 

हरिंदर सिक्का लिखित 'कॉलिंग सहमत' नावाच्या पुस्तकाविषयीच्या एका समारंभादरम्यान तिने ते पुस्तक उलट पकडलं होतं. ज्यानंतर अनेकांनी तिला, 'अजाण' म्हणत तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. 

एक लहानशी चूक सध्या या 'धडक'फेम अभिनेत्रीला चांगलीच महागात पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्यावर होणारे विनोद आणि खिल्ली उडवली जाण्याकडे जान्हवी मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. यावेळी ती फक्त आगामी चित्रपट आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

आईच्या निधनानंतर वडील आणि बहिणीच्या साथीने जान्हवीने या क्षेत्रात मोठ्यआ धीराने पाऊल ठेवलं. येत्या काळात ती 'रूही अफजा' आणि 'दोस्ताना २' अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.