काजलने लग्नबंधनात अडकण्याच्या काही मिनिटांपूर्वी शेअर केला 'हा' बोलका फोटो

ही आहे वादळापूर्वीची शांतता....   

Updated: Oct 30, 2020, 06:14 PM IST
काजलने लग्नबंधनात अडकण्याच्या काही मिनिटांपूर्वी शेअर केला 'हा' बोलका फोटो
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्नबंधनात अडकण्यापूर्वी अनेक भावना वधू- वराच्या मनात घर करुन असतात. दडपण, आनंद, उत्साह, कुतूहल आणि भीती अशा अनेक भावनांचा जणू काहूरच माजलेला असतो. अभिनेत्री काजल अग्रवाल Kajal Aggarwal हिनंही सध्या अशाच परिस्थितीचा सामना केला आहे. विवाहबंधनात अडकण्याच्या काही तासांपूर्वीच अगदी शांतपणे बसून शून्यात रोखलेली काजलची नजर खूप काही सांगून जात आहे. 

सोशल मीडियावर याच काही क्षणांचा फोटो शेअर करत काजलनं आपल्या मनाची अवस्थाच सर्वांपुढे ठेवली आहे. एका वादळापूर्वीची शांतता... असं कॅप्शन देत तिनं कृष्णधवल रंगातील हा फोटो शेअर केला आहे. 

फोटोमध्ये तिचा लेहंगाही धुसरसा दिसत आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याआधी असंख्य विचारांनी दाटलेले ढग जणू काजलला त्या क्षणी घेराव घालून होते असाच हा बोलका फोटो. यामध्ये तिचा मेकअप आणि हेअरस्टाईलही पाहण्याजोगी आहे. 

 
 
 
 

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

 

सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट करताच अनेकांनीच काजलला शुभेच्छा देत अतिशय सकारात्मकतेनं आणि आनंदानं या क्षणांना सामोरं जाण्याच्या सदिच्छा दिल्या. इथं एका अभिनेत्रीसोबतचं चाहत्यांचं अव्यक्त नातंही पाहायला मिळालं.