'...याच कारणासाठी मला Pregnant व्हायचंय'

मुख्य म्हणजे रुपेरी पडद्यावर ... 

Updated: Nov 3, 2020, 03:59 PM IST
'...याच कारणासाठी मला Pregnant व्हायचंय'
छाया सौजन्य - इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं तिच्या अभिनय कौशल्याच्या बळावर हिंदी कलाविश्वात आपलं स्थान कायम केलं. फक्त अभिनयच नव्हे, तर कियाराच्या सौंदर्यावरही अनेकजण फिदा झाले. अशी ही अभिनेत्री 'कबीर सिंग' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आणि त्यामागोमागच खिलाडी कुमार, दिलजित दोसांज आणि करीना कपूर खान यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करत तिनं आपलं वेगळेपण सिद्ध केलं. 

'गुड न्यूज' या चित्रपटातून कियारा झळकली होती. ज्यामध्ये ती एका गरोदर महिलेच्या भूमिकेत दिसली होती. मुख्य म्हणजे रुपेरी पडद्यावर गरोदरपणाचा अभिनय करणाऱ्या या अभिनेत्रीनं या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधताना काही मजेशीर गोष्टी स्पष्टही केल्या होत्या. 

सूत्रांच्या माहितीनुसार ही बाब आहे याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानची. जेव्हा करीनानं तिच्या गरोदरपणात अनेकांनीच तिला चांगला आहार घेण्याचा सल्ला दिला होता. याचवेळी खिलाडी कुमारनं आपलं म्हणणं इथं मांडत गरोदर महिलांना लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो असं म्हणत कियारानं केव्हा ला़डू खाल्ले आहेत का असा प्रश्न केला. पण, आपण केव्हाच गरोदर राहिलो नसल्यामुळं लाडू खाल्लेच नसल्याची बाब विनोदी अंदाजात स्पष्ट केली. 

 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

 

आपल्या याच उत्तराचा संदर्भ देत कियारानं मग गरोदरपणाबाबत असं वक्तव्य केलं होतं की सर्वांना धक्काच बसला. मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या खाण्यासाठी म्हणूनच मला गरोदर व्हायचं आहे, असं कियारा म्हणाली. आपल्याला एका सुदृढ बालकाचं बालकत्त्वं हवं असल्याची अपेक्षाही तिनं बोलून दाखवली होती. शिवाय तिनं 'गुड न्यूज' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आपण मोठ्या प्रमाणात गोडाचे पदार्थ खाल्ल्याचंही सांगितलं.