खान कुटुंबाची सून आता दिसतेय दुपटीनं बोल्ड, तरुणींनाही लाजवतायेत तिच्या अदा

मॉडलिंगच्या दिवसांपासूनच मलायकानं तिच्या सौंदर्याच्या चाहत्यांची संख्य़ा वाढवली होती

Updated: May 24, 2022, 02:23 PM IST
खान कुटुंबाची सून आता दिसतेय दुपटीनं बोल्ड, तरुणींनाही लाजवतायेत तिच्या अदा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : हिंदी कलाविश्वामध्ये आतापर्यंत अनेक अशा अभिनेत्रींनी राज्य केलं, ज्याच्या अस्तित्वानंच चाहत्यांना हायसं वाटत होतं. अशा या अभिनेत्रींमध्ये काहीजणी तर, कैक दशकं चाहत्यांचा वेड लावत आहेत. आजही आपल्या एका फोटोनं अनेकांच्याच मनाचा ठाव घेणाऱ्या अशाच काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, मलायका अरोरा. 

मॉडलिंगच्या दिवसांपासूनच मलायकानं तिच्या सौंदर्याच्या चाहत्यांची संख्य़ा वाढवली होती. कमनीय बांधा, गहूवर्णीय सौंदर्य आणि त्यात तिची रोखलेली नजर म्हणजे शब्दांतही मांडणं कठीण. (Bollywood Actress Malaika Arora bold photo )

खान कुटुंबाची सून झाली, त्या क्षणीसुद्धा ती आपल्या कामापासून मात्र दुरावली नाही. अशी ही मलायका  (Malaika Arora) आता तिच्या एका फोटोमुळं अचानकच पुन्हा चर्चेत आलीये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GRAZIA India (@graziaindia)

तिचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. कारण, यात तिचं सौंदर्यच तितकं कमाल आहे. तसा हा फोटो फारसा जुना नाही. यामध्ये मलायका सॅटिन मटेरियलचा शर्ट आणि शिमरी ब्लॅक नाईट वेअरमध्ये दिसत आहे. 

मोकळे केस, साजेशी कंटेम्प्ररी ज्वेलरी असा लूक तिनं केला आहे. वयाच्या पन्नाशीकडे जात असतानाही मलायकानं तिच्या सौंदर्याची बरीच काळजी घेतल्याचं पाहायला मिळतं. 

खान कुटुंबाशी असणारं नातंही कायमच चर्चेत... 
मलायकानं अभिनेता- दिग्दर्शक अरबाज खान याच्याशी लग्न केलं होतं. एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान अरबाजशी तिची ओळख झाली आणि पुढे या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. 

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 1998 मध्ये हिंदू आणि ख्रिस्त पद्धतीनं त्या दोघांनी लग्न करत सहजीवनाची सुरुवात केली. पण, 19 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर त्यांच्या या नात्याला तडा गेला आणि अरबाज मलायकाचा घटस्फोट झाला. 

अरबाजपासून वेगळं झाल्यानंतर तिनं अभिनेता अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरुवात केली. अर्जुन आणि मलायका आता त्यांचं हे नातं पुढच्या वळणावर नेण्याच्या म्हणजेच लग्नाच्या विचारात असल्याचंही म्हटलं जात आहे.