Malaika Arora Sizzling : वयाच्या 48 व्या वर्षी मलायकाचा HOT अंदाज; अर्जुनही होईल घायाळ!

कसीनो लॉचिंगवेळी (Casino Louching) मलायका अरोराचा (Malaika Arora) बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल!

Updated: Sep 19, 2022, 04:23 PM IST
Malaika Arora Sizzling : वयाच्या 48 व्या वर्षी मलायकाचा HOT अंदाज; अर्जुनही होईल घायाळ! title=

Malaika Arora: मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील (Bollywood Actress) सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. मलायकाला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे अशक्यच म्हणावं लागेल. अशातच मलायकाचा (Malaika Arora Video) एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. (bollywood actress malaika arora latest hot look spotted in Casino Louching)

कसीनो लॉचिंगवेळी (Casino Louching) मलायका अरोराचा (Malaika Arora) बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर 'टॉक ऑफ द टाऊन' बनला आहे. ऑफ शोल्डर ड्रेस घालून मलायकाने कसीनोमध्ये सर्वांच्या नजरा सामावून घेतल्या. यावेळी रेड कार्पेटवर (Red carpet) मलायकाने किलर अंदाज दाखवला. त्यामुळे पावसाळ्यात देखील मलायकाने आग लावली, अशी कमेंट तिच्या चाहत्यांनी केली आहे.

मलायकाने तिच्या याच खास अदांनी अजुर्न कपूरला (Arjun Kapoor) देखील भुरळ घातली, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होताना दिसते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका ठुमके लगावताना देखील दिसत आहे. मलायका आणि अर्जुन कपूर कायम सोबत दिसतात. काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे पिकनिकचे फोटो व्हायरल झाले होते.

मलायकाचा लुक पाहून (Malaika Arora Sizzling) तिच्या वयाचा कोणाला अंदाज देखील येत नसेल. तिचं वय 48 असताना देखील अर्जुनसारखे कलाकार तिच्यावर घायाळ होतात. मलायका तिच्या फिटनेसवर (Fitness) जास्त लक्ष देताना दिसते. अनेकदा ती जीममध्ये जाताना देखील स्पॉट होते. तिची फॅन फॉलोवर्स देखील जबरदस्त आहे.