Actress Mrunal Thakur Will Attend Cannes Film Festival 2023: 'कान्स फिल्म फेस्टिवल 2023' आजपासून सुरू होतो आहे. यावेळी जगभरातील मान्यवर चित्रपट कलाकार आणि दिग्गज मंडळी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही कान्स फिल्म फेस्टिवलला (Bollywood Celebrity at Cannes) हजेरी लावली आहे. प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या रॉय बच्चन, आलिया भट्ट, दिपिका पादूकोण, हिना खान अशा अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींनीही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. त्यांचा रेड कार्पेट लुक हा तेव्हा बराच चर्चेत आला होता. यामध्ये सर्वाधिक गाजला तो म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिचा रेड कार्पेट (Aishwarya Rai Red Carpet Cannes) लुक.
बॉलिवूडच्या इतक्या सर्व अभिनेत्रींनंतर आता अजून एक अप्सरा कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. या अभिनेत्रीचं नावं आहे मृणाल ठाकूर. ही मराठमोळी अभिनेत्री सध्या कान्स महोत्सवातील रेड कार्पेट आपल्या दिलखेचक अदाकारीनं गाजवणार आहे. सोबतच यावेळी ती पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती लावणार असून तिला अनेक मोठ्या दिग्गज आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. आपल्या या कान्समधील डेब्यूसाठी (Mrunal Thakur Cannes Debut) मृणाल ठाकूरनं आपल्या भावना व्यक्त करत आपण या सोहळ्यासाठी खूप उत्साही आहोत असं म्हटलं आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली की, ''कान्स फिल्म फेस्टिवलला मी पहिल्यांदा उपस्थित राहणार आहे तेव्हा यावेळी खूप उत्सुक आहे. जागतिक फिल्ममेकर्सना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मी फार उत्सुक असून त्यांच्या संवाद साधण्यासाठी मी फार आतुर आहे. यावेळी नव्या संधी आजमावाच्या आहेत सोबतच भारतीय सिनेमाची प्रतिभा एवढ्या मोठ्या सोहळ्याला उपस्थितीत राहत मी त्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.''
हेही वाचा - Photos: Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''
मृणाल ठाकूर ही आज बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. हिंदी टेलिव्हिजनमधून तिनं आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. 'कुमकुम भाग्य' या मालिकेतून तिनं महत्त्वपुर्ण भुमिका केली होती. त्यानंतर या मालिकेतून ब्रेक घेत तिनं बॉलिवूड चित्रपटांकडे जाण्याची तयारी दाखवली आणि म्हणता म्हणता तिला चांगले चित्रपटही मिळू लागले. यावेळी तिन हिंदीसह दाक्षिणात्त्य चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. हृतिक रोशनसोबच्या 'सुपर 30' या चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यानंतर तिला लव्ह सोनिया हा चित्रपट मिळाला आणि मृणाल ठाकूर हे नावं सर्वत्र गाजले.
'बाटला हाऊस', 'घोस्ट स्टोरीज', 'जर्सी', 'तूफान', 'धमाका' अशा हिंदी चित्रपटांसह तिनं 'विटी दांडू', या मराठी चित्रपटातूनही अभिनय केला आहे. 'सीता रामम' (Sita Ramam) हा तिचा पहिला दाक्षिणात्त्य चित्रपट आहे. 'सेल्फी' आणि 'गुमराह' हे तिचं काही दिवसांपुर्वी आलेले चित्रपट बरेच गाजले. तिनं अनेक म्यूझिक व्हिडीओजही बनवले आहेत. 'लस्ट स्टोरीज 2', 'नानी 30', 'पुजा मेरी जान', 'पिप्पा' हे तिचे काही (Mrunal Thakur Upcoming Films) आगामी काळातील चित्रपट आहेत.