पहिलं किस‌‌ अन् बरंच‌ काही... बॉलिवूड दिवाचं दिलखुलास वक्तव्य

अनेक गोष्टींवर 'तिने' खुलेपणाने चर्चा केली.

Updated: Nov 25, 2019, 07:38 PM IST
पहिलं किस‌‌ अन् बरंच‌ काही... बॉलिवूड दिवाचं दिलखुलास वक्तव्य title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने नुकतंच एका कार्यक्रमात तिच्या खासगी आयुष्यासंबंधी काही गमतीशीर गोष्टींचा खुलासा केला. पहिली किस, गरोदरपणी, बॉडी शेमिंगबाबत अनेक गोष्टींवर तिने खुलेपणाने चर्चा केली.

नेहाने एका रॅपिड फायर राऊंडमध्ये तिच्या शाळेपासूनच्या गोष्टींचा खुलासा केला. शाळेच्या आठवणींबद्दल बोलताना नेहाने, गणिताच्या विषयात इतरांप्रमाणे आपणही कसे कच्चे होतो हे सांगितलं. बरं गणितात हुशार नसूनही, आपण कधी नापास न झाल्याचंही तिने सांगितलं.

सर्वात पहिलं किस कधी केलं? या प्रश्नावर नेहाने, २०व्या वर्षी पहिलं किस केल्याचं सांगितलं. तर सर्वात सेक्सी गोष्टीबद्दल विचारल्यावर तिने, माझं डोकं सर्वात सेक्सी असल्याचं उत्तर देत प्रश्न विचारणा-यांनाही चक्रावून सोडलं.

 ट्रोलर्सकडून नेहाला बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर नेहाने अशा ट्रोलर्सना, त्यांनी आपल्या आयुष्याकडे लक्ष देऊन, स्वत:चं आयुष्य जगावं, असा 'मोलाचा' सल्ला दिला.

पहिली किस आणि शाळेतील धमाल याविषयी सांगता सांगता नेहाने पुढे तिच्या अनुषंगाने सर्वोत्तम अभिनेता म्हणून रणबीर कपूर, तर अभिनेत्री म्हणून करिना कपूरला पसंती दिली. यामध्ये ती बी टाऊनची सर्वात मादक अभिनेत्री म्हणून प्रियांकाचा उल्लेख करायलाही विसरली नाही.

खासगी आयुष्य असो किंवा मग रुपेरी पडदा, नेहाने कायमच तिला हव्या त्याच‌ पद्धतीने गोष्टी हाताळल्या, ज्याबाबत तिला कोणतीही गोष्ट खटकली नाही. सोशल मीडियापासून सेलिब्रिटी मीडियापर्यंत प्रत्येक ठिकाणी‌ नेहाचा हाच अंदाज तिला अधिक खास ठरवून जातो हे खरं.