Nora Fatehi 'तो' व्हिडिओ व्हायरल, Video पाहून चाहते चक्रावले

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. 

Updated: May 22, 2022, 09:06 PM IST
Nora Fatehi 'तो' व्हिडिओ व्हायरल, Video पाहून चाहते चक्रावले    title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. नोरा आपले फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगलीय.  

व्हिडिओत काय ?

इन्स्टंट बॉलिवूड या चॅनेलने नोराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही कारमध्ये बसलेल्या तरूणासोबत जबरदस्त डान्स करताना दिसतेय. या व्हिडिओत नोराने डीप नेक ड्रेसमध्ये घातलाय. या बोल्ड स्टाईलमध्ये ती नाचताना दिसतेय.  अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इतका धमाकेदार आहे की, चाहत्यांना तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतोय.  

नोरा फतेही एक खूप चांगली डान्सर आहे. तिने 'किक 2', 'बाहुबली', 'टेम्पर' सारख्या तेलुगू चित्रपट आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी आयटम नंबर केले आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे.