Panchayat 2 मध्ये सालस दिसणारी 'ही' अभिनेत्री वास्तवात आहे इतकी बोल्ड

पंचायत सीझन 1 च्या यशानंतर आता पंचायत 2 वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आलीय. या सीरीजमधील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पंचायत 2 चर्चेत आहे. 

Updated: May 22, 2022, 08:42 PM IST
Panchayat 2 मध्ये सालस दिसणारी 'ही' अभिनेत्री वास्तवात आहे इतकी बोल्ड  title=

मुंबई : पंचायत सीझन 1 च्या यशानंतर आता पंचायत 2 वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आलीय. या सीरीजमधील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पंचायत 2 चर्चेत आहे. जितू भय्या उर्फ जितेंद्र कुमारने पंचायत सचिवाची भूमिका साकारलीय, तर रघुबीर यादव, नीना गुप्ता यांसारखे दिग्गज कलाकार देखील या सीरीजमध्ये आहेत. या सोबतचं रिंकीच्या भूमिकेत सान्विकाने ही अभिनेत्री सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. रिंकी ही सीरीजमध्ये साधीसुधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती तितकीच ग्लॅमरस आहे. तिचे सोशल मीडिवरील फोटोचं या गोष्टी सांगतात.  

सान्विकाने प्रधान यांची मुलगी रिंकीची भूमिका साकारलीय. या सीरिजमध्ये नेहमीच साध्या कपड्यांमध्ये दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे. 

'पंचायत 2' वेब सीरिजमध्ये सान्विकाची भूमिका खूप पसंत केली जात आहे. मालिका रिलीज झाल्यानंतर अनेक प्रेक्षक तिला नेटवर सर्च करत आहेत. 

सान्विकाने इंस्टाग्रामवर खुप अ‍ॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिला ४७ हजार लोक फॉलो करतात. सान्विकाने अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. या फोटोला कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतो. 

2020 मध्ये 'पंचायत' वेब सिरीज रिलीज झाली, ज्यामध्ये बलिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत फुलेराची कहाणी सांगण्यात आली होती. ही मालिका लोकांना खूप आवडली.आता दोन वर्षांनी तिचा दुसरा सीझन प्रदर्शित झालाय, या दुसऱ्या सीझनचेही खुप कौतून होतेय.