प्रियंका चोप्राचे असे फोटो समोर आलेत, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजकल भारतापेक्षा अधिक अमेरिकेत दिसत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 3, 2017, 11:06 AM IST
प्रियंका चोप्राचे असे फोटो समोर आलेत, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल
छाया सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजकल भारतापेक्षा अधिक अमेरिकेत दिसत आहे. अलिकडे प्रियंकाने ड्वेन जॉन्सन (रॉक) यासारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध हॉलिवूड स्टारबरोबर 'बेव्हॉच'मध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. ती जरी आधीपासूनच आंतरराष्ट्रीय टीव्ही शो क्वांटिको ती काम असली तरी तिने परदेशी फॅन्सचे हृदय जिंकलेय.

प्रियंका चोप्राकडे बॉलिवूडचे सिनेमे असले तरी काही नवीन हॉलीवूड प्रोजेक्ट्स तिने साइन केले आहेत. त्यामुळे प्रियंका न्यूयॉर्कमध्ये आहे. मात्र, दरम्यानच्या काळात प्रियंका चोप्राचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

प्रियंकाला कोणी पकडून ठेवले आहे आणि का? प्रियंकाची कोणी छेड काढली आहे. ही छेड का काढली असेल असे प्रश्न मनात फोटो पाहिल्यावर येतात. मात्र, प्रियंकासोबत हॉलिवूड स्टार एडम डिवाइन दिसत आहे. तो  'पिच परफेक्ट' या हॉलिवूड फिल्ममधून तुम्ही पाहिला असेल.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियंका कोल्ड शॉलर ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्ही-नेक या ड्रेसमध्ये तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत आहेत. प्रियंकाला कमरेत पकडून तिला उचलून घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे न्यूयॉर्कमधील या फोटोचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रियंका आणि एडम हे दोघे डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. त्यापैकी हा एक फोटो नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रियंका आणि एडम यांचा नवा सिनेमा येत आहे. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. प्रियंकाला खाताना घास अडकतो. त्यामुळे तिची अवस्था केविलवाणी होते. तिला सावरण्यासाठी एडम धाऊन जातो. घशातील घास बाहेर काढण्यासाठी एडम प्रयत्न करतो, असे या सिनेमातील दृश्य आहे. त्यामुळे तिची कोणी छेड काढलेली नाही, बरं का?

या चित्रपटात प्रियंका आणि एडम यांच्या व्यतिरिक्त रिबेल विल्सन, लिम हम्सवर्थ यांच्यासारखे स्टार आहेत. हा सिनेमा २०१८मध्ये व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होणार आहे.