How I met your father... म्हणणाऱ्या प्रियांकाची 'ही' पोस्ट पाहिली का?

'मुलांना आपली प्रेमकहाणी नक्कीच सांगेन....'

Updated: May 6, 2019, 12:26 PM IST
How I met your father... म्हणणाऱ्या प्रियांकाची 'ही' पोस्ट पाहिली का?

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिचा मोर्चा परदेशी कलाविश्वाकडे वळवला. पाहता पाहता 'देसी गर्ल' कधी परदेशी विश्वात रमली याचा अंदाजही आला नाही. आता तर तिने थेट संसारही परदेशातच थाटला आहे. अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधत प्रियांकाने तिच्या कामासोबतच वैवाहिक आयुष्यालाही सुरुवात केली. 

प्रियांका आणि निकला सर्वप्रथम माध्यमांनी एकत्र टीपलं ते म्हणजे 'मेट गाला'च्या निमित्ताने. २०१७ मध्ये ही जोडी 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर आली होती. पुढे जाऊन त्यांच्या भेटी वाढल्या, ओळख आणि हे नातं आणखी दृढ झालं. अखेर या नात्याची अधिकृत घोषणा करत निक आणि प्रियांका यांनी सहजीवनाची शपथ घेतली. अशा या सुरेख नात्याच्या सुरुवातीच्या काही आठवणींना प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

निमित्त ठरलं ते म्हणजे 'मेट गाला २०१९'चं. यंदाच्या मेट गालामध्येही प्रियांका आणि निकची एकत्रित उपस्थिती असणार आहे. पण, तत्पूर्वी काही जुन्या आठवणी आणि निकसोबतची पहिली भेट पुन्हा सर्वांच्याच भेटीला आणत तिने इन्टा स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला. राल्फ लॉरेनच्या ट्रेंच कोट गाऊनमध्ये प्रियांका आणि टक्सेडोमध्ये निकचा लूक साऱ्या कलाविश्वाच्याच स्मरणात आहे. मुळात ते क्षण या दोघांसाठीही तितकेच महत्त्वाचे होते. एका अनोख्या प्रेमकहाणीची सुरुवात करणाऱ्या त्याच क्षणांविषयी आपल्या मुलांना मी नक्कीच सांगेन... अशा आशयाचं कॅप्शन लिहित ‘how I met your father’ ही सुरेख आणि तितकीच लक्षवेधी ओळही तिने फोटोवर लिहीली. आपल्या मुलांना या प्रेमकहाणीविषयी सांगण्याची उत्सुकताच तिच्या या पोस्टमधून पाहायला मिळाली.