....म्हणून प्रियांकाच्या भावाच्या लग्नाची तारीख ऐनवेळी बदलली

भावाच्या लग्नापूर्वीच प्रियांका अमेरिकेला रवाना 

Updated: Apr 30, 2019, 05:21 PM IST
....म्हणून प्रियांकाच्या भावाच्या लग्नाची तारीख ऐनवेळी बदलली

मुंबई : अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्न झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा परदेशातच स्थिरावली. गेल्या काही दिवसांपासून बी- टाऊनची ही देसी गर्ल भारतात आली होती. मतदानाचा हक्क बाजवतही तिने आपलं भारतात येणं सार्थकी लावलं. प्रियांका भारतात आली होती ते म्हणजे तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा याच्या लग्नसोहळ्यासाठी. सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीसाठी म्हणून गेले काही दिवस चोप्रा कुटुंबात बरीच लगबगही पाहायला मिळाली. किंबहुना काही विधिंना सुरुवातही झाल्याचं पाहायला मिळालं. पण, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाच्या भावाच्या लग्नाची तारीख ऐनवेळी बदलण्यात आली आहे. परिणामी प्रियांकाही अमेरिकेला रवाना झाली आहे. 

लग्नासाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाच हे घडणं चाहत्यांसाठीही अनपेक्षित आहे. सिद्धार्थ चोप्रा आणि इशिता कुमार यांच्या लग्नाची तारीख काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. इशितावर अचानकच एक शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे आता तिला यातून सावरण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. याच कारणामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. खुद्द इशितानेच तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती देत सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये तिने कॅप्शनच्या माध्यमाकून वेदनांनाही वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळालं. 

Wedding on the weekend

 
 
 
 

A post shared by Ishita Kumar (@ishittaakumar) on

अचानकच लग्नाची तारीख बदलल्यामुळे काही खासगी आणि व्यावसायिक कारणांनी प्रियांका अनेरिकेला रवाना झाली आहे. त्यामुळे इशिताच्या प्रकृतीतत सुधारणा झाल्यानंतरच प्रियांकाच्या भावाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. तेव्हा आता काही दिवसांच्या सुट्टींनंतर ही देसी गर्ल पुन्हा तिच्या कमावर लक्ष केंद्रित करताना दिसणार आहे.