मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक Michael O' Dwyer या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनाव राज्य करणारा अभिनेता विकी कौशल अवघ्या काहबी काळातच बी- टाऊनमधील आघाडीच्या कलाकारांच्या यादीत पोहोचला. येत्या काळात तो आणखी एका असामान्य कथानकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. खुद्द विकिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी चित्रपटातील रुप आणि भूमिका नेमकी कोणती असणार आहे, यावरुन पडदा उचलला. शूजित सरकार दिग्दर्शित 'सरदार उधम सिंग' या चित्रपटातून विकी मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. सध्या कलाविश्वात त्याच्या या आगामी चित्रपटाच्याही चर्चांना सुरुवात झाली आहे.
विकीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याचा चेहरा भावविरहीत दिसत असून, त्याचं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधत आहे. लांब बाह्यांचा राखाडी रंगाचा कोट, हातात टोपी, कोणा एका गोष्टीवर रोखलेली नजर असा एकंदर त्याचा लूक पाहता पुन्हा एकदा विकी त्याच्या अंदाजान प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
बायोपिक प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटातून १९४० दरम्यानचा काळ साकारण्यात येत आहे. ज्यामध्ये स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उधम सिंग यांच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. पंजाबच्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी स्वातंत्रपूर्व भारतातील पंजाबचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर Michael O' Dwyer यांची हत्या केली होती, ज्या प्रसंगावर या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा उजेड टाकण्यात येणार आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार विकीही या चित्रपटासाठी अतिशय उत्सुक आहे. शूजित सरकारसोबत काम करण्याची त्याची फार दिवसांपासूनची इच्छा होती. त्यामुळे याच इच्छाशक्तीच्या बळावर मिळालेला हा चित्रपट विकीला पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आणेल असं म्हणणं वावगं ठरणार नाही.