close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून प्रियांकाची मेहंदी, मंगळसूत्र ठरलं खास

पहिल्या भेटीनंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यातील नातं दिवसागणिक आणखी दृढ होत गेलं. 

Updated: Dec 4, 2018, 10:29 AM IST
...म्हणून प्रियांकाची मेहंदी, मंगळसूत्र ठरलं खास

मुंबई : ऑस्करच्या आफ्टर पार्टीत पहिल्यांदाच भेटल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्यातील नातं दिवसागणिक आणखी दृढ होत गेलं. त्यातही 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर त्यांचं एकत्र येणं जगभरातील कलाविश्वाचं लक्ष वेधून गेलं. 

बऱ्याच चर्चांच्या गर्दीत अखेर या जोडीने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आणि जोधपूर येथील उमेदभवन पॅलेसमध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधली. प्रियांका आणि निक ख्रिस्त आणि हिंदू अशा दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजांनुसार लग्नाच्या बेडीत अडकले. 

शाही थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाल्यानंतर ही जोडी माध्यमांसमोर आली, तेव्हा प्रियांकाच्या नववधू रुपावरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मोरपिसी रंगाची, सोनेरी एम्ब्रॉयडरी असणारी साडी, भांगात कुंकू, हातात चुडा आणि मेहंदी असा एकंदर तिचा लूक अधिक उठावदार दिसत होता. 

'देसी गर्ल'च्या या लूकमध्ये लगेचच लक्ष गेलं ते म्हणजे तिच्या मेहंदीवर. निकच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तिच्या मेहंदीमध्ये गिटार रेखाटण्यात आली होती. निक हा अतिशय लोकप्रिय अमेरिकन गायक असून, खुद्द प्रियांकाही त्याच्या चाहत्यांपैकी एक आहे. 

निकवर असणारं प्रेम व्यक्त करण्याचा प्रियांकाचा हा अंदाज नक्कीच सर्वांची मनं जिंकत आहे. 'देसी गर्ल'च्या मंगळसूत्राविषयीसुद्धा चाहत्यांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळालं. खडे, काळे मणी आणि सोन्याच्या सुरेख डिझाईनला तिने प्राधान्य दिलं असून, सोशल मीडियावर प्रियांकाच्या या लूकची बरीच चर्चा झालीएक फॅन्सी पण, तितकच शोभिवंत असं मंगळसूत्रंही घातलं होतं. 

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांका-निकने दिल्लीत एका स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं आहे.