Met Gala 2019 : प्रियांकाची खिल्ली उडवणाऱ्यांनो 'त्या' गाऊनची किंमत ऐकून व्हाल थक्क

याच्यासोबत रेड कार्पेटवर आलेल्या या 'देसी गर्ल' प्रियांकाची चर्चा सर्वदूर सुरु झाली.   

Bollywood Life | Updated: May 9, 2019, 09:06 AM IST
Met Gala 2019 : प्रियांकाची खिल्ली उडवणाऱ्यांनो 'त्या' गाऊनची किंमत ऐकून व्हाल थक्क

मुंबई : मेट गाला, या न्यूयॉर्क शहरात पार पडणाऱ्या काही अद्वितीय कार्यक्रमांपैकी एक असणाऱ्या सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राची उपस्थिती नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक वर्षी प्रियांका या सोहळ्याता हटके रुपात येते आणि फॅशन विश्वासोबतच चाहत्यांनाही धक्का देते. यंदाच्या मेट गाला २०१९ मध्येही तिचं असंच काहीसं रुप पाहायला मिळालं. पती निक जोनास याच्यासोबत रेड कार्पेटवर आलेल्या या 'देसी गर्ल' प्रियांकाची चर्चा सर्वदूर सुरु झाली. 

किंबहुना त्याची खिल्लीच जास्त उडवली गेली. तात्याविंचूपासून, क्रिकेटपटू मलिंगाच्या हेअरस्टाईलशी तिच्या या लूकची तुलनाही करण्यात आली. Camp: Notes on Fashion अशी थीम यंदाच्या मेट गालासाठी देण्यात आली होती. त्याच थीमला अनुसरून प्रियांकाने avant-garde silver Dior गाऊन घातला होता. Mimi Cuttrellने तिच्या या लूकसाठी स्टायलिंग केलं होतं. 'देसी गर्ल'च्या याच बहुचर्चित लूकवर निशाणा साधत त्याची खिल्ली उजडवणाऱ्यांना आता थक्क करणारी माहिती वोगकडून मिळत आहे. ती माहिती आहे प्रियांकाच्याच या गाऊनसंबंधी. 

प्रियांकाच्या Met Gala 2019 त्या बहुचर्तित आऊटफिटसाठी तिने तब्बल ४,५८३,२८० रुपये इतकी घसघशीत किंमत मोजली. तर, त्यासोबत असणाऱ्या जिम्मी चू या ब्रँडच्या चंदेरी रंगाच्या स्टिलेटोसाठी तिने २४,०३० इतकी किंमत मोजली होती. Chopard तर्फे तिच्या या लूकसाठीची ज्वेलरी (आभूषणं) तयार करण्यात आली होती.

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

Accessने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १०० कॅरेटच्या या आभूषणांमध्ये ८८.८२ कॅरेटचे sapphire briolettes, ३.८० कॅरेटचं diamond briolettes आणि १८ कॅरेट सोन्यात मढवलेला ०.३८ कॅरेटचा डायमंड सेटचा समावेश होता. Copacabana Collection या लक्झरी डिझाईन हाऊसकडून तो साकारण्यात आला होता. तिच्या कर्णफुलांची (कानात असणारे डूल) किंमतच ४५०,८०० रुपयांच्या घरात होती. प्रियांकाने घातलेल्या या आभूषणांमध्ये Happy Diamonds Collection आणि Haute Joaillerie Collection च्याही आभूषणांचा समावेश होता. अनेक कलाकार, त्यांची कला आणि एकंदर त्यांच्या मेहनतीने साकारलेला तिचा हा लूक पाहता अबब! केवढा हा खर्च अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. प्रियांकाच्या लूकविषयीची ही माहिती वाचून तुम्हीही झालात की नाही थक्क?