मुंबई : भूमिका आणि कथानकाची गरज असल्याच तिथं बोल्ड सीनचीही आवश्यकता भासली तर तो साकारण्यास दुसऱ्यांदा विचार न करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एकीचं नाव गेल्या काही वर्षांमध्ये फार प्रकाशझोतात आलं.
वेब सीरिजपासून ते अगदी लघुपटांपर्यंत आणि चित्रपटांपर्यंतही या चेहऱ्यानं धुमाकूळ घातला.
मादक सौंदर्यातूनच सारंकाही बोलणारा हा चेहरा आहे अभिनेत्री राधिका आपटे हिचा.
विविध मुद्द्यांवर आपले विचार परखडपणे मांडणारी राधिका कायमच तिच्या भूमिकांच्या निवडींबाबतची ठाम दिसून आली.
आपण साकारणाऱ्या भूमिकेतून प्रेक्षकांवर प्रभाव पाडायचा या एका ध्यासानं जणू ती पेटून उठलेली.
बोल्ड सीन, इंटिमेट दृश्य यामुळं राधिकावर अनेकदा सर्वांच्या नजरा खिळल्या.
'पार्च्ड' सारख्या चित्रपटातून तिनं साकारलेलं प्रणदृश्य त्यावेळी सेन्सॉरपासून अनेकांनाच हादरवून गेलं होतं.
2018 मध्ये 'द वेडिंग गेस्ट'मध्ये तिनं देव पटेल याच्यासोबत एक बोल्ड सीन दिला होता.
न्यूड व्हिडीओ व्हायरल होण्याबाबतही राधिका स्पष्टपणे बोलली होती.
'क्लीन शेवन'च्या चित्रीकरणादरम्यान माझा न्यूड व्हीडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली होती.
सारं वातावरण असं होतं की, मी चार दिवसांपर्यंत घराबाहेरही पडले नव्हते, असं ती म्हणाली.
आपण साकारत असलेल्या भूमिकांबद्दल राधिकानं कायम मोकळेपणानं वक्तव्य केली. न्यूड सीनबाबत बोलतानाही तिचा आत्मविश्वास कुठेच डगमगलेला दिसला नाही.