बॉक्स ऑफिसवर 'मर्दानी २'ची जबरदस्त पकड....

चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई... 

Updated: Dec 16, 2019, 06:03 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'मर्दानी २'ची जबरदस्त पकड....  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी हिची मुख्य भूमिका असणारा 'मर्दानी २' हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही वाहवा मिवळवत आहे. तिकीट खिडक्यांवर राणीच्या या चित्रपटाची चांगली पकड दिसत आहे. त्यामुळे सरत्या वर्षाने राणीला चित्रपटाच्या यशाच्या रुपात एक चांगली भेट दिली, असं म्हणायला हरकत नाही. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. #Mardaani2 ला आठवड्याच्या शेवटी चांगला प्रतिसाद मिळाला आहे असं सांगत एका चांगल्या कथानकाच्या चित्रपटाची ताकद या चित्रपटाने दाखवून दिल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. पहिल्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने एकूण १८.१५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती आदर्श यांच्या ट्विटमधून मिळाली. आदर्श यांचं हे ट्विट पाहता चित्रपटांच्या या गर्दीतही राणीच्या अभिनयाने बाजी मारली आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

एका बलात्कार करणाऱ्या आरोपीला पडकड्यासाठी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत झळकणारी राणी प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने भावली आहे. #Mardaani2 हा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या Mardaani या चित्रपटाचा सिक्वल आहे. आदित्य चोप्राची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर्स अंतर्गत करण्यात आली आहे. १३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सध्याची कमाई पाहता वर्षअखेरीसही अशीच घोडदौड सुरु राहिल्यास #Mardaani2च्या वाट्याला चांगलंच यश येईल हे नाकारता येणार नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x