'इन आँखों की मस्ती के....'; रेखा यांच्या भाचीला पाहूनही नकळत तुम्ही हेच म्हणाल

पाहा ती सध्या काय करते...   

Updated: Jul 7, 2022, 12:09 PM IST
'इन आँखों की मस्ती के....'; रेखा यांच्या भाचीला पाहूनही नकळत तुम्ही हेच म्हणाल  title=
Bollywood Actress rekha niece priya selvaraj glamorous photo goes viral

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या सौंदर्याच्या चाहत्यांची संख्या न मोजलेलीच बरी. कारण, ही संख्या संपणारच नाही. अनेकांच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव, भानुरेखा गणेशन. रेखा यांनी एक काळ गाजवत त्यांच्या मनावर अधिराज्य केलं. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

बालपणापासून रेखा यांनी चित्रपट जगतामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. रेखा यांचे पालकही प्रसिद्ध कलाकार होते. त्यांचे वडील जेमिनी गणेशन आणि आई, पुष्पावली यांनी रेखा यांच्या जन्माच्या वेळी लग्न केलेलं नव्हतं. गणेशन यांचे आणखीही महिलांशी संबंध होतं असं म्हटलं जातं. 

रेखा यांना सहा बहिणी आणि एक भाऊ. प्रत्येक बहिणीसोबत त्यांचं खास नातं. त्यांच्या एका बहिणीच्या मुलीनं एकाएकी सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. सोशल मीडियावर अचानकच तिचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. 

रेखा यांची बहीण कमला सेल्वाराज यांची ही लेक. त्या पेशानं डॉक्टर आहेत. कमला यांना एक मुलगी आहे, प्रिया असं तिचं नाव. प्रियाही एक डॉक्टर आहे आणि तिचा चेहरा बऱ्याच अंशी रेखा यांच्याशी मेळ खातो. 

प्रिया आणि रेखा यांचे काही फोटो एकमेकांशेजारी ठेवून पाहिलं असता, तीसुद्धा तरुणपणीच्या रेखाप्रमाणेच दिसते असं अनेकांचं म्हणणं. अंगकाठी, लांबसडक केस, नजर रोखणारे डोळे आणि मन मोहणारं हास्य असं प्रियाचं रुप. 

प्रियाच्या सोशल मीजिया अकाऊंटवर गेलं असता तिच्या जीवनशैलीचा अंदाज येतो. कुटुंब वस्तल असण्यासोबतच ती एक यशस्वी महिलाही आहे, हे तिच्या पोस्ट पाहून लक्षात येतं. प्रियाचे फोटो पाहून तुम्हाला काय वाटतं?