...म्हणून रियाला मिळाला जामीन; पाहा निकालातील मह्त्वाचे मुद्दे

दुसऱ्या व्यक्तीला अमलीपदार्थाचे सेवन करण्यासाठी ... 

Updated: Oct 7, 2020, 03:49 PM IST
...म्हणून रियाला मिळाला जामीन; पाहा निकालातील मह्त्वाचे मुद्दे
संग्रहित छायाचित्र

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आत्महत्या प्रकरणाला अनेक दिवस उलटून गेले असतानाही त्याबाबतच्या चर्चा काही शमलेल्या नाहीत. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून सदर आत्महत्या प्रकरणाशी जोडूनच तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी सुशांतची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती rhea chakraborty  हिला अमली पदार्थ पुरवठा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. परिणामी पुन्हा एकदा या प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

दुसऱ्या व्यक्तीला अमलीपदार्थाचे सेवन करण्यासाठी पैसे दिले म्हणजे देणारी व्यक्ती त्याला उत्तेजन देत आहे आणि अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २७-अ अन्वये अमलीपदार्थांसाठी वित्तपुरवठा करणे आणि आरोपीला आश्रय देण्यासारखे होते, हा एनसीबीचा युक्तिवाद मान्य करता येणार नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी मांडलं. 

- रिया चक्रवर्ती ड्रग्ज डीलर चेनचा हिस्सा नाही

- रियाला सर्वात प्रथम कोर्टसमोर हजर करण्यात आलं तेव्हा NCB ने तिचा ताबा मागितला नव्हता. 

- याचा अर्थ ncb तिच्या चौकशीबाबत समाधानी होती आणि तिने सहकार्य केलं होतं

- सुशांत सिंह राजपूत हा स्वत:च्या घरात राहत होता आणि स्वत:च्या गरजांसाठी खर्च करत होता. त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा नोंद नव्हता.

- त्यामुळं रिया चक्रवर्तीने त्याला आश्रय दिला आणि अमली पदार्थ मिळवण्यासाठी पैशांचा पुरवठा केला, असे म्हणता येणार नाही

- रियाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. 

 

- तसंच अमलीपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीतही ती सहभागी असल्याचं दिसत नाही. 

- रिया ड्रग्ज सिडिकेटची सक्रिय सदस्य आहे याबाबत NCB पुरावे देऊ न शकल्यानं रियाला जामीन मिळाला.

- NCBनं ज्या कलमांतर्गत कारवाई केली ती कलम कोर्टात NCB सिद्ध करू शकले नाहीत.