मुंबई : आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी एक अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. सारानं फार कमी कालावधीतच आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत जाऊन बसण्याचा मान मिळवला. सारा तिच्या स्वभावामुळंही कायमच चर्चेत असते. लहानमोठ्यांसोबत साराची वागणूकही तिला सर्वांपासून वेगळं ठरवून जाते. अशी ही सैफ अली खानही लाडाची लेक अशाच कारणामुळं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी सारोबत फोटो काढण्यासाठी पुढे येते. साराही तिच्यासोबत फोटो काढून घेते. खुद्द साराच त्या मुलीच्या हातातून फोन घेत तिला फोटो काढून देते. पण, तिनं मास्क न लावल्याचं लक्षात येताच काळजीपोटी ती त्याबद्दल प्रश्नही करताना दिसते.
तुझा मास्क कुठे आहे, तू कायमच मास्क वापरला पाहिजे.... असं ती त्या मुलीला उद्देशून म्हणताना दिसते. सारा असं म्हणताच ती मुलगी मागे उभ्या असणाऱ्या तिच्या आईवडिलांकडे पाहते. जे पाहून सारा त्यांना त्या मुलीलाल कृपया मास्क देण्याची विनंती करताना दिसते. साराच्या सांगण्यानंतर ती मुलगी लगेचच पळत जाऊन मास्क घेऊन येताना दिसते.
साराचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यावर एकनाअनेक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. साराचा हा इतरांप्रती काळजी करण्याचा स्वभाव कोणाच्या मनाचा ठाव घेत आहे, तर परिस्थितीचं भान राखण्याला ती देत असणारं प्राधान्य अनेकांचं मन जिंकून जात आहे.