साराला पाहताच महिलेनं दिलेली प्रतिक्रिया वेधतेय लक्ष

पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ   

Updated: Nov 4, 2020, 03:24 PM IST
साराला पाहताच महिलेनं दिलेली प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून हिंदी कलाजगतामध्ये नावारुपास आलेल्या अभिनेत्री sara ali khan सारा अली खान हिनं कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. फार कमी वेळातच बी टाऊनचा नवाब अभिनेता सैफ अली खान याची ही लाडाची लेक प्रसिद्धीझोतात आली. 

असं असलं तरीही मागचा काही काळ मात्र ती, एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत राहिली. ड्रग्ज प्रकरणात नाव पुढं आल्यानंतर साराचीही एनसीबीनं चौकशी केली. ज्यानंतर या प्रकरणाला बरीच हवा मिळाली. साराच्या प्रसिद्धीझोतात किंवा तिच्या प्रतिमेला मात्र यामुळं धक्का लागला नाही. 

परिणामी चाहत्यांमध्ये तिच्यासाठी असणारं प्रेमही तसुभरसुद्धा कमी झालेलं नाही. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओतून याचा प्रत्यय येत आहे. ज्यामध्ये साराच्या लोकप्रियतेचा सहज अंदाज लावता येत आहे. मुंबई विमानतळावर चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये साराच्या भोवती माध्यमांच्या छायाचित्रपकारांचा वावर असल्याचं कळत आहे. तर, विमानतळावरच असणाऱ्या एका महिलेकडून तिला पाहून येणारी सुंदर प्रतिक्रिया हा व्हिडिओ आणखी खास करत आहे. 

 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

सारा तू फार गोड आहेस, असं ही महिला म्हणत असून, साराही त्यांचे आभार मानताना दिसत आहे. इतकच नव्हे तर, तेथून बाहेर पडत असतानाही ती सर्वांचेच आभार मानताना दिसत आहे. साराची ही अदा आणि सर्वांप्रती असणारी तिची आदराची वागणूकच या लोकप्रियतेमागचं खरं गुपित आहे, असं म्हणायला हरकत नाही.