अपघातात गमावला पहिला बॉयफ्रेंड, आठवणीनं शमिता शेट्टीच्या अश्रुंचा बांध फुटला

'बिग बॉस ओटीटी' Bigg Boss OTT या रिअॅलिटी शोमधून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री शमिता शेट्टी हिनं तिच्या खासगी जीवनातील अत्यंक महत्त्वाच्या घटनेबद्दल याच रिअॅलिटी शोमध्ये खुलासा केला. 

Updated: Sep 8, 2021, 09:40 PM IST
अपघातात गमावला पहिला बॉयफ्रेंड, आठवणीनं शमिता शेट्टीच्या अश्रुंचा बांध फुटला
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' Bigg Boss OTT या रिअॅलिटी शोमधून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री शमिता शेट्टी हिनं तिच्या खासगी जीवनातील अत्यंक महत्त्वाच्या घटनेबद्दल याच रिअॅलिटी शोमध्ये खुलासा केला. 

राकेश बापट याच्यासोबतच्या खास, अतिखास मैत्रीमुळं चर्चेत असणाऱ्या शमितानं तिच्या खासगी जीवनातील एक पान उलटलं आणि तिच्या भावनांचा बांध फुटला. संवेदनशील आणि अतिशय भावनिक स्वभावाच्या शमितानं नेहा भसीन हिच्याशी गप्पा मारताना हे गुपित उघड केलं. 

पहिलं प्रेम जीवनात खुप काही देऊन जातं. ते अपूर्ण राहिलं तरीही खूप साऱ्या आठवणी देऊन जातं. शमिताच्या जीवनातही हा टप्पा आला होता. तिचं पहिलं प्रेम अर्थात तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचं एका कार अपघातात निधन झालं होतं. याच कारणामुळं तेव्हापासून शमिता फार भावनिक झाली. त्यावेळी या आघातातून सावरण्यासाठी तिला बराच वेळही गेला, असं सांगताना ढसाढसा रडणारी शमिका कॅमेरात कैद झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BigBosKhabri (@bigboskhabri)

सध्या शमिताचं कुटुंबही अडचणीच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत शमिता मोठ्या धीरानं या शोमध्ये सहभागी होत आहे, हे पाहून चाहत्यांनी तिला दिलासा देत तिच्या धाडसाला दाद दिली.