लांब वेणी, डोळ्यात काजळ अन्...; श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'च्या सेटवरील पहिला फोटो समोर

Shraddha Kapoor Stree 2 : काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने 'स्त्री 2' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. 

Updated: Jan 3, 2024, 07:18 PM IST
लांब वेणी, डोळ्यात काजळ अन्...; श्रद्धा कपूरचा 'स्त्री २'च्या सेटवरील पहिला फोटो समोर title=

Shraddha Kapoor Stree 2 : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग शूटींगला सुरुवात झाली आहे. आता या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

'फिल्मफेअर' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन श्रद्धा कपूरचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रद्धा कपूर ही फारच उत्साही असल्याचे दिसत आहे. तिचा फोटो पाहून अनेकांनी हा 'स्त्री 2' चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या फोटोत श्रद्धा कपूर ही लांब वेणी, कपाळावर टिकली, टोचलेलं नाक, डोळ्यात काजळ अशा लूकमध्ये दिसत आहे. यावेळी ती फारच गोड हसताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

 

यात श्रद्धाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर करड्या रंगाचा जॅकेट परिधान केला आहे. यावेळी तिच्या हातात एक समोसाने भरलेली प्लेट पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने 'स्त्री 2' या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करत असल्याचे म्हटले होते. यावेळी श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावने 'स्त्री 2' चित्रपटातील एक थरारक व्हिडीओ शेअर केला होता. या पोस्टवर “पुन्हा एकदा चंदेरी शहरात पसरली स्त्रीची दहशत, ऑगस्ट 2024 मध्ये ती येणार…”असे कॅप्शन दिले होते.

 

दरम्यान 'स्त्री' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार झळकले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि अभिनेते पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.