मुंबई : कपूर कुटुंबामध्ये सुरु असणारे लग्नसराईचे वारे आता म्हणे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या घरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. 'आशिकी गर्ल' म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी श्रद्धा मागील काही काळापासून छायाचित्रकार (Photographer) रोहन श्रेष्ठा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
श्रद्धा आणि रोहनच्या नात्याची चर्चा कितीही जोर धरत असली तरीही या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. असं असूनही आता त्या थेट त्या दोघांच्या लग्नाच्याच चर्चांनी जोर धरला आहे. येत्या काही दिवसांमध्ये श्रद्धा आणि रोहन सप्तपदी घेत नव्या जीवनाची सुरुवात करणार असल्याचं कळत आहे.
प्रियकरासोबत खास क्षण
काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूर मालदिवमध्ये गेली होती. भाऊ, प्रियांक शर्मा याच्या लग्नाच्या निमित्तानं ती मालदिवमध्ये गेली होती. त्यावेळी तिनं रोहनसोबत बरेच खास क्षण व्यतीत केले असं म्हटलं जात आहे. श्रद्धा आणि रोहनचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे पाहता, माध्यमांकडून श्रद्धाची मावशी, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि त्यांचा मुलगा प्रियांक शर्मा यांना श्रद्धाच्या लग्नाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.
लग्नाबाबत नेमका काय विचार?
प्रियांकला श्रद्धाच्या लग्नाबाबत विचारताच, त्यानं दिलेलं उत्तर सर्वांनाच विचारात टाकून गेलं. 'मी नो कमेंट्स असं म्हणतोय... अरे मी काय सांगू यावर. हा पण, जर भविष्यात तुम्ही याबाबतच्या काही आशा बाळगत आहात तर स्पष्टच आहे. लग्नाची वाट पाहणं चांगलंच आहे की... '. लग्नाचा तसा काही बेत असेल तर तुम्हाला माहिती मिळेलच असं उत्तर पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिलं. आता श्रद्धाच्या कुटुंबातील मंडळीच तिच्या लग्नाबाबत असं काही बोलू लागले तर तिच्या लग्नाच्या चर्चा तर होणारच....