मुंबई : अभिनेत्री, गायिका, मॉडेल आणि सूत्रसंचालिका अशा विविध भूमिका निभावणाऱ्या शिबानी दांडेकर ( shibani dandekar) हिनं तिच्या खासगी आयुष्याबाबत मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि तितकेच महत्त्वाचे निर्णय घेतले.
अभिनेता फरहान अख्तर (farhan akhtar) याच्यासोबतचं नातं शिबानीनं जाहीरपणे स्वीकारलं आणि या नात्याची सुरेख बाजू कायमच चाहत्यांना दाखवली. फरहाननंही अधुना अख्तर हिच्यासोबतच्या नात्यातून विभक्त झाल्यानंतर शिबानीसोबतच्या नात्याचा स्वीकार केला. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही सेलिब्रिटी जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना कपल गोल्स देत आहे.
शिबानीच्या वाढदिवसानिमित्तानं फरहाननं त्या दोघांचा अतिशय सुरेख फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यानं दिलेलं कॅप्शनही तितकंच रंजक आहे. एकिकडे फरहाननं प्रेयसी शिबानी हिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. तर, दुसरीकडे शिबानीनंत मोठा निर्णय घेत स्वत:च्या वाढदिवसाच्याच दिवशी फरहानला सरप्राईज दिलं आहे.
शिबानीचं हे सरप्राईज अर्थातच फरहानसोबतच्या तिच्या नात्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहे. शिबानीनं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये याबाबतची नोट आणि फोटो शेअर केला. जिथं तिच्या मानेवर एका बाजूला फरहानच्या नावाचा टॅट्टू कोरला गेल्याचं दिसत आहे.
इंग्रजीमध्ये अतिशय आकर्षक शैलीत तिच्या मानेवर हा टॅट्टू काढण्यात आला आहे. शिबानीनं फरहानचं नाव आपल्या मानेवर कोरल्याचं पाहून त्याच्यासाठीही ही अतिशय खास बाब असणार यात शंका नाही. दरम्यान, टॅट्टू पाहिल्यानंतर प्रेमाची जाहीर ग्वारी देणारी ही जोडी आता विवाहबंधनात केव्हा अडकते, हाच प्रश्न चाहत्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.