सलीम खान यांची सून होणार सोनाक्षी? पहिलं प्रेम कोण, आली बाब समोर

आतापर्यंत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा समोर आली नव्हती. पण, आता मात्र बी- टाऊनची ही पहिली 'दबंग गर्ल' म्हणे लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. थेट खान कुटुंबाशीच तिचं नातं जोडलं जाण्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. 

Updated: Nov 25, 2021, 05:39 PM IST
सलीम खान यांची सून होणार सोनाक्षी? पहिलं प्रेम कोण, आली बाब समोर
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आतापर्यंत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा समोर आली नव्हती. पण, आता मात्र बी- टाऊनची ही पहिली 'दबंग गर्ल' म्हणे लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. थेट खान कुटुंबाशीच तिचं नातं जोडलं जाण्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. 

खान कुटुंब आणि सलीम खान यांची सून असा उल्लेख झाल्यास सोनाक्षी आणि सलमान..... असेच विचार तुमच्याही डोक्यात घर करत आहेत ना? 

सोनाक्षीचं नाव सध्या अभिनेता सोहेल खान याच्या पत्नीचा भाऊ, बंटी सचदेवा याच्याशी जोडलं जात आहे. खान कुटुंबाशी बंटीचं असणारं नातं पाहता ती एक प्रकारे सलीम खान यांची सूनच होणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीला शालेय वयातच पहिलं प्रेम अनुभवता आलं होतं. पण, शिक्षणामुळं तिनं या साऱ्याला वाव दिला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

जवळपास 5 वर्षे हे नातं टिकलं, पण तो नेमका कोण होता त्याचं नाव मात्र सोनाक्षीनं सांगितलेलं नाही. 

सोनाक्षीनं तिच्या जीवनातील खास व्यक्तीचं नाव सांगितेललं नसलं तरीही ही खास व्यक्ती म्हणजे बंटी सचदेवाच असल्याचं म्हटलं जात आहे. 

सोनाक्षी आणि बंटीला अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आहे. एका मुलाखतीत तिनं बंटी एक स्वावलंबी पुरुष असल्याचं म्हणत सध्या तो बॅचलरहूडचा आनंद घेऊ इच्छितो असं स्पष्ट केलं होतं. 

सोनाक्षी आणि बंटी खरोखरचं विवाहबंधनात अडकले तर, ती सलमान खानची नातेवाईक होणार आहे. ज्यामुळं आता या नात्याबाबत तिच्याच अधिकृत वक्तव्याची सर्वजण प्रतीक्षा करत आहे.