close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुष्मिता- रोमनच्या नात्यात दुरावा?

काही दिवसांपूर्वीच तिने या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमक्ष ठेवली होती 

Updated: Jun 27, 2019, 09:24 AM IST
सुष्मिता- रोमनच्या नात्यात दुरावा?

मुंबई : बराच काळ रुपेरी पडद्यावर झळकली नसली तरीही अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासही आयुष्यामुळे मात्र बरीच चर्चेत आहे. एकल मातृत्व असो किंवा मग प्रेमप्रकरणं, त्यात आलेलं यश- अपयश या अशा गोष्टी सुष्मिताला कायमच प्रकाशझोतात आणत होत्य़ा. पुन्हा एकदा याच धर्तीवरील चर्चांनी तिला प्रकाशझोतात आणलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच रोमन शॉल याच्यासोबतच्या नात्याविषयी मोठ्या आत्मियतेने एका मुलाखतीत वक्तव्य करणाऱ्या सुष्मिताचा अंदाज साऱ्यांचं लक्ष वेधून गेला. रोमन आणि तिचं नातं पाहता या सौंदर्यवतीच्या आयुष्यात आलेल्या आनंदाचा अनेकांनाच हेवाही वाटला. पण, आता मात्र परिस्थितीला एक वेगळंच आणि काहीसं अनपेक्षित वळण मिळाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रोमनने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या स्टेटसवरुन असे अंदाज वर्तवले जात आहेत. रोमनने रिलेशनशिप, नात्यांविषयी काही सूचक वाक्य लिहिली आहेत. 

तुम्ही फक्त रिलेशनशिपमध्य़े आहात म्हणून साथीदाराने तुम्हाला चांगली वागणूक द्यावी अशीच तुमची अपेक्षा आहे? तरीही जे व्यक्ती तुम्हाला चांगली वागणूक देत नाहीत आणि तुम्ही तरीही त्यांच्यासोबत आहात तर हा तुमचा दोष आहे! असं लिहित 'स्वत:वर प्रेम करा...', हा सूचक संदेश त्याने या पोस्टमधून दिला आहे. 

Sushmita Sens boyfriend Rohman Shawl

रिलेशनशिपविषयी रोमनचे विचार पाहता अनेकांच्याच (चाहत्यांच्या) मनात काही प्रश्नांनी घर केलं आहे. मुळात अनेकदा स्टेटस हे केवळ आवडीनिवडींवरही अवलंबून असतात. पण बहुतांश वेळा ते खऱ्या आयुष्याशीही निगडीत असल्याचं प्रतित होतं. त्यामुळे रोमनने नेमक्या या ओळी कोणत्या कारणामुळे त्याच्या स्टेटसमध्ये ठेवल्या आहेत हे कळायला मार्ग नाही. 

सुष्मिता आणि रोमनचं नातं हे अनेक दिवसांपासून चर्चेत होतं. वयामध्ये असणारं अंतर पाहता हे नातं लक्ष वेधत आहे. मुख्य म्हणजे या नात्याच्या बाबतीत कमालीची काळजी घेणारी आणि गांभीर्य पाळणारी सुष्मिता यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.