'हा तर तैमूर...' अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

पाहा फोटो...

Updated: Sep 13, 2019, 09:22 AM IST
'हा तर तैमूर...' अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : 'स्टुडन्ट ऑफ द ईयर २' फेम अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या स्टायलिश फोटोमुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरते. पण आता साराने एक असा फोटो शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

तारा सुतारियाने तिच्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोमध्ये तारा अतिशय क्यूट दिसतेय. ताराचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 
 
 
 

A post shared by TARA (@tarasutaria) on

ताराच्या या फोटोवर अनेक मजेशीर कमेंटही येत आहेत. अनेकांनी तिला, लहानपणी ती तैमूर अली खानसारखी दिसत असल्याचंही म्हटलंय. तर काहींनी पारलेजी गर्लही म्हटलंय. 

 
 
 
 

A post shared by TARA (@tarasutaria) on

 
 
 
 

A post shared by TARA (@tarasutaria) on

ताराने 'स्टुडेन्ट ऑफ द ईयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता तारा तेलुगू सुपरहिट 'आरएक्स १००' या चित्रपटाच्या रीमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटातून सुनिल शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. 

याशिवाय तारा लवकरच सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख स्टारर 'मरजांवा'मध्येही भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.