close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मतदारांना बॉलिवूडकरांचे आवाहन, मतदानाने बनते आपली सरकार...

बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी मतदानाचे महत्व पटवून देत नागरिकांना मतदान करण्याचा आग्रह केला आहे.

Updated: Mar 27, 2019, 11:05 AM IST
मतदारांना बॉलिवूडकरांचे आवाहन, मतदानाने बनते आपली सरकार...

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे 2019चे बिगूल अखेर वाजले. सर्वच पक्षांकडून प्रचाराचा नारळ फुटला आहे. काहीदिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कला क्रिडा क्षेत्रातील मंडळींना एक आवाहन केले होते. देशातील जनतेने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी अनेक दिग्गजांकडे विनंती केली होती. मतदान हा सामान्य जनतेचा हक्क आहे. त्यामुळे देशाला सक्षम सरकार मिळते. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळींनी मतदानाचे महत्व पटवून देत नागरिकांना मतदान करण्याचा आग्रह केला आहे.

जेष्ठ अभिनेते अनुपम खेर, शेखर कपूर, आर. माधवन यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला मतदानाचा संदेश दिला आहे. अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले , 'आम्ही मतदान करून सरकार निवडुण आणतो. ज्याची आम्हाला गरज आहे. तर मी माझ्या भारतीय बांधवांना विनंती करत आहे, की त्यांनी लोकसभा निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क पार पाडावा.'

 

त्याचप्रमाणे चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी सांगितले, 'भारताच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क प्रदान केला आहे.'

 

 

अभिनेता आर. माधवनने लोकशाहीला मजबुत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.