'या' कलाकारांनी का वापरलं वडिलांऐवजी आईचं नाव?

तुम्हाला हे माहिती आहे का की बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आपल्या आईचं आडनाव लावलं आहे.  

Updated: May 13, 2022, 11:50 AM IST
'या' कलाकारांनी का वापरलं वडिलांऐवजी आईचं नाव? title=

मुंबईः कोणतीही व्यक्ती त्याच्या नावाने ओळखली जाते. तसंच काहींना आडनावामुळे प्रसिद्धी मिळते. तुमचं आडनाव तुम्ही कोणत्या कुटुंबातील आहात हे सांगते. खरंतर अनेक जण परंपरेप्रमाणे वडिलांचं सरनेम लावून करियर करतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी आपल्या आईचं आडनाव लावलं आहे.


मल्लिका शेरावत: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा होतं. पण मल्लिकाने वडिलांचे आडनाव सोडून आईचे आडनाव लावलं आणि तेच पुढे कायम ठेवलं.

रिया सेन: अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री रिया सेन प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी मुनमुन सेन यांची मुलगी आहे. रिया सेनच्या वडिलांचं नाव भरत देव वर्मा आहे पण रियाने नेहमीच तिच्या आईच्या आडनावाने आपली ओळख निर्माण केली.

संजय लीला भन्साळी: राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आपल्या आईवर खूप प्रेम करतात आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्या नावासमोर त्यांच्या आईचे नाव म्हणजेच लीला भन्साळी लावलं... लहानपणीच त्यांनी नावात हा बदल केला होता.

इम्रान खान: एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने लोकांचं मनोरंजन करणाऱ्या इम्रान खानने आपल्या आईचे आडनाव लावलं. इमरानच्या आई-वडिलांचे नाव नुजरत खान आणि अनिल पटेल आहे. पण इम्रानने पटेल सोडून खान हे आडनाव लावलं

लिसा हेडन: एकेकाळी आपल्या हॉट लूकने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालणारी लिसा हेडननेही तिच्या आईचे आडनाव लावलं  आहे. लिसाचे वडील दक्षिण भारतीय असून त्यांचं आडनाव वेंकट आहे, परंतु लिसाने वडिलांचे आडनाव सोडून आईचे आडनाव कायम केलं.

कोंकणा सेन: बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा उमद्या अभिनेत्रींची चर्चा होते तेव्हा कोंकणाचे नाव नक्कीच घेतलं जातं. कोंकणा अशी अभिनेत्री आहे जिचा चित्रपटात सर्वोत्तम असण्याची हमी आहे. कोंकणा देखील आपल्या नावापुढे आईचं आडनाव लावलं...कोंकणाच्‍या आईचे नाव अपर्णा सेन आहे.