Richa Chaddha and Ali Fazal Wedding : अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांचे लग्न (Richa Chaddha & Ali Fazal Marriage) ठरले असून आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या काही दिवसांतच ते दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या घरीही लग्नाची जोरात तयारी सुरू आहे. रिचा आणि अलीही सध्या सोशल मीडियावरून एकमेकांसोबतचे एकत्र फोटो शेअर करत आहेत.
रिचा चढ्ढा आणि अली फैसल यांच्या लग्नाचे विधी 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. मुंबईत 6 ऑक्टोबरला त्याचं लग्न आहे. ऋचा आणि अली यांना लग्नाचे काही नियम (Wedding rules) त्या दोघांनी आखले आहेत.
रिचा आणि अली यांनी त्यांच्या लग्नात 'नो फोन पॉलिसी' (No Phone Policy at Wedding) न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाबरोबरच त्यांची एक अट आहे. ती अट अशी की त्यांच्या लग्नाचे फोटो (Wedding Photos) कोणी क्लिक करू नयेत.
आणखी वाचा - घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट
तिथे येणाऱ्या पाहुण्यांना लग्नाचा क्षण आरामात एन्जॉय करता यावा यासाठी या जोडप्याने नो फोन पॉलिसी (No Phone Policy) न ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
आपल्या लग्नात येणाऱ्या पाहूण्यांना फोनमध्येच अडकवून न ठेवता त्यांच्या लग्नातील सुंदर क्षणांचा आनंद त्यांनीही घ्यावा अशीही त्यांच्या इच्छा आहे परंतु पाहूण्यांना त्यांना कुठल्याही बंधनात अडकवून ठेवायचं नाहीये. या जोडप्याचीही अशीही इच्छा आहे की लग्नात येणाऱ्या पाहूण्यांना लग्नात कसलीच कसर पडू नये त्यामुळेच त्यांनी सर्वांना फोन आणण्याची परवानगी दिली आहे.
आणखी वाचा - 'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव
रिचा चड्ढा आणि अली फजलची अनोखी लग्नपत्रिका (Richa Chaddha & Ali Fazal Unique Wedding Card)-
रिचा आणि अलीच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वेडिंग कार्डची (Richa Chaddha & Ali Fazal Wedding Card) सध्या सर्वत्र चर्चा आहे. हे वेडिंग कार्ड माचिसच्या डबीवर (Match Box Wedding Card) तयार केले असून या डबीवर त्या दोघांची छबी अगदी रेट्रो लुकमधल्या हिरो - हिरोईन प्रमाणे आहे. यात ते दोघं सायकलवर बसलेले दिसत असून हे चित्र पॉप आर्ट (Pop Art) पद्धतीनं तयार केलं आहे.
हा लुक पुर्णत: नव्वदच्या दशकातला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, रिचा तिच्या लग्नातही पारंपारिक दागिने परिधान करताना दिसणार आहे, तेही राजस्थानी शैलीत. तिच्या लग्नासाठी बिकानेर (Bikaner) येथील एका कुटुंबाकडे दागिने बनवण्याचे काम सोपवण्यात आले असून 175 वर्ष जुन्या ज्वेलर परिवार (Jeweller Family) यासाठी नेमण्यात आला आहे. कॅशियर कुटुंब रिचाचे दागिने बनवत आहेत, अशी माहिती कळते.