मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाईचा माहोल दिसून येत आहे. एकिकडे रणबीर – आलियाच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता आणखी एका सेलिब्रिटी जोडीनंही लग्नगाठ बांधत सहजीवनाला सुरुवात केली.
आलिया आणि रणबीरच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला असतानाच आता त्यांच्या फोटोंना टक्कर देण्यासाठी आणखी एका सेलिब्रिटी जोडीनं एंट्री घेतली आहे.
ही सेलिब्रिटी जोडी म्हणजे सायरस साहुकार आणि वैशाली मलहारा. 15 एप्रिलला वैशाली आणि सायरसनं लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून असणाऱ्या रिलेशनशिपला या जोडीनं एक नवं नाव दिलं.
कुटुंब आणि काही खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांनी डेस्टिनेशन वेडिंगमध्ये एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याची वचनं दिली.
सायरसनं लग्नासाठी ऑफव्हाईट शेरवानी आणि फेट्याला पसंती दिली होती. तर, वैशालीनं लाल रंगाच्या लेहंग्याला पसंती दिली होती.
सायरस आणि वैशालीच्या लग्नासाठी समीर कोच्चर, कबीर खान, मिनी माथुर, साहिल सांघा यांचीही उपस्थिती होती.
6 वर्षांच्या नात्याला लग्नबंधनात अडकवणाऱ्या सायरस आणि त्याच्या पत्नीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. कामाचं सांगावं तर, सायरल एक अभिनेता आणि एक व्हिजेही आहे. विविध चित्रपटांतून त्यानं साकारलेली प्रत्येक भूमिका त्याचं वेगळेपण सिद्ध करणारी होती.