'हा' चेहरा करुन देतोय दिव्या भारतीची आठवण

मंजू आणि दिव्या यांच्यात केवळ दिसण्यावरुन नव्हे तर दोघींच्या जन्माबाबतही विशेष साम्य आहे.

Updated: Jul 31, 2021, 04:43 PM IST
'हा' चेहरा करुन देतोय दिव्या भारतीची आठवण

मुंबई: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या बबली अंदाजामुळे ती आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. अभिनेत्री दिव्या भारतीला चाहते अजूनही विसरु शकलेले नाहीत. दिव्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात इंडस्ट्रीच्या टॉप स्टार्ससोबत स्पर्धा केली. दिव्याने आपल्या इंडस्ट्रीतील छोट्या कारकिर्दीत केवळ 12 सिनेमे केले. आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिचं निधन झालं.

दिव्या भारतीच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडलं होतं. मात्र, दिव्या अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. दरम्यान, आता दिव्या भारतीसारखी दिसणारी एक मुलगी चांगलीच चर्चेत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जाणून घेऊया कोण आहे ही मुलगी?

दिव्या भारतीप्रमाणे दिसणाऱ्या या मुलीचं नाव मंजू थापा असं आहे. मंजू आणि दिव्या यांच्यात केवळ दिसण्यावरुन नव्हे तर दोघींच्या जन्माबाबतही विशेष साम्य आहे. दिव्या भारती आणि मंजू या दोघींची जन्मतारीख एकच आहे.

अभिनेत्री दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला होता. त्याचवेळी मंजूचा जन्म 25 फेब्रुवारी 2003 मध्ये झाला. मंजू थापा दार्जिलिंगची राहणारी आहे. तिचा जन्म कोलकाता येथे झाला. मंजू अवघ्या 9 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर, मंजूच्या आईने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली.

मंजू थापाचे बालपण 

मंजू थापाला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. तिने वयाच्या 15 व्या वर्षी 'प्लॅनेट मिस इंडिया वर्ल्ड 2018' ,  'मिस टीन रिपब्लिक ऑफ इंडिया 2018' आणि 'मिस ग्लोरी ऑफ नोटीस 2018' सारख्या सौंदर्य स्पर्धांचे विजेतेपद मिळवलं आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मंजूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर लोकांनी तिला पाहिले आणि सांगितले की ती दिव्या भारती सारखी दिसते. तेव्हापासून मंजूची लोकप्रियता वाढू लागली. सध्या तिचे इंस्टाग्रामवर 31 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या झपाट्याने वाढत आहे.