इतिहासातील सर्वात हिट सिनेमा, २२ हजार कोटींची कमाई

आज सिनेमांच्या कमाईची भरभरून चर्चा केली जात आहे. १०० कोटींचे क्लब आता वाढू लागले आहेत. पण एक ८० वर्षापूर्वीही एका सिनेमाने २२,२०० कोटींची कमाई केल्याचे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

Updated: Nov 7, 2017, 10:46 AM IST
इतिहासातील सर्वात हिट सिनेमा, २२ हजार कोटींची कमाई title=

मुंबई : आज सिनेमांच्या कमाईची भरभरून चर्चा केली जात आहे. १०० कोटींचे क्लब आता वाढू लागले आहेत. पण एक ८० वर्षापूर्वीही एका सिनेमाने २२,२०० कोटींची कमाई केल्याचे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

पण हे खरं आहे. क्लार्क गेबल आणि विवियन ले यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गॉन विथ द वाईंड’ हा हॉलिवूड सिनेमाने आतापर्यंत सर्वात चांगल्या सिनेमांपैकी एक मानला जातो. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स कायम केले होते.  

१९३९ मध्ये आलेल्या 'Gone With The Wind' या सिनेमाची निर्मिती करण्यासाठी त्या काळात ३८.५ लाख डॉलर खर्च करण्यात आले होते. या सिनेमाने त्या काळात ३९ कोटी डॉलरची पेक्षा जास्त कमाई केली होती. जर या सिनेमाच्या कलेक्शनचं इन्फ्लेशनचा हिशोब केला गेला तर २०१४ मध्ये या सिनेमाची कमाई जवळपास २२ हजार २०० कोटी रूपये इतकी होते. कमाईच्या बाबतीत या सिनेमाच्या आसपास २००९ मध्ये आलेला ‘अवतार; हा सिनेमा आहे. या सिनेमाने साधारण १९ हजार ५०० कोटींची कमाई केली होती. 

'Gone With The Wind' हा एक शानदार सिनेमा आहे आणि जगातल्या सर्वात चांगल्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यावर विश्वास ठेवणे कठिण होते. हा सिनेमा २५ वर्षांपर्यंत आपल्या कमाईच्या रेकॉर्डवर कायम राहिला होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x