कतरिना हातची गेली, आता सलमानपुढे उरला 'हा' पर्याय

तरिनाप्रमाणे दिसणाऱ्या या तरुणीचं नाव आहे....

Updated: Dec 7, 2021, 10:39 AM IST
कतरिना हातची गेली, आता सलमानपुढे उरला 'हा' पर्याय
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ ही लवकरच विकी कौशल याच्यासोबत विवाहबंधनात अडकत आहे. 9 डिसेंबरला ही जोडी सहजीवनाची एक नवी सुरुवात करताना दिसणार आहे. एकिकडे कतरिना लग्न करण्यास सज्ज होत असतानाच तिथे तिचा खास मित्र आणि अभिनेता सलमान खान याच्याप्रती मात्र चाहत्यांनी सहानुभूती व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 

अनेक चाहत्यांनी तर कतरिनाऐवजी हुबेहूब तिच्याप्रमाणे दिसणाऱ्या एका तरुणीची माहिती सलमानला देऊ लागले आहेत. 

अलीना राय असं कतरिनाप्रमाणे दिसणाऱ्या या तरुणीचं नाव आहे. 

सोशल मीडियावर ती फारच सक्रिय आहे. व्हिडीओ कंटेंटमुळं तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

कतरिना तिथे विवाहबंधनात अडकत असल्यामुळं आता अनेक चाहते अलीना आणि सलमानची जोडी जुळवू पाहत आहेत. 

2019 मध्ये लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह याच्या म्युझिक अल्बममधून ती झळकली होती. 'कमाल है' असं या अल्बमचं टायटल. इथं बादशाहासोबत अलीना झळकली होती. 

सोशल मीडिया पर एक्टिव हैं अलीना

सलमान को दिया पता

अलीनाच्या प्रत्येक पोस्टला असंख्य लाईक्स असतात. तिचा चेहरा कतरिनाशी फार जुळतो. ज्यामुळं अनेकदा काही चाहते तर ही कतरिना आहे का अलीना म्हणून गोंधळतातसुद्धा. 

येत्या काळात अलीनासुद्धा चित्रपटातून झळकणार आहे.काही दिवसांपूर्वीच तिनं चित्रीकरणादरम्यानचे फोटोही शेअर केले होते.