Irrfan Khan ला दोन वर्षांपूर्वी लागली मृत्यूची चाहुल, नक्की काय आहे सत्य?

एक वर्षानंतर इरफान खानच्या मृत्यूचं रहस्य समोर  

Updated: Dec 7, 2021, 10:17 AM IST
Irrfan Khan  ला दोन वर्षांपूर्वी लागली मृत्यूची चाहुल, नक्की काय आहे सत्य?

मुंबई : गेले काही दिवस बॉलिवूडसाठी प्रचंड धक्कादायक होते. अनेक दिग्गज कलाकारांनी अखेरचा निरोप घेतला. त्यामधील एक म्हणजे अभिनेते इरफान खान. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं. अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या इरफान खान यांच्या अचानक जाण्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला. आजही त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होतं. आजही इरफान यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्या चाहत्यांमधील एक मोठं नाव म्हणजे अभिनेते नसीरुद्दीन शाह.
 
नसीरुद्दीन शाह यांनी देखील इरफान खान यांच्या अभिनयाचे कौतुक केले. अलीकडेच नसीरुद्दीन शाह यांनी इरफान यांच्या मृत्यूबद्दल आणि त्याच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इरफानबद्दल बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले की, इरफानची सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे मृत्यूच्या दोन वर्ष आधीही त्यांना माहित होते की इरफान जास्त काळ जगू शकणार नाही.

नसीरुद्दीन पुढे म्हणाले, 'मी त्यांच्याशी फोनवर अनेकदा बोललो. लंडनमध्ये उपचार सुरू असतानाही माझं इरफानसोबत बोलणं झालं. इरफानसाठी हा एक वेगळा अनुभव होता. ते मृत्यूला खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. 

'इरफान यांना वाटले की यमराज माझ्या दिशेने येत आहेत आणि मी त्याचे स्वागत करत आहे. पण शेवटी आपल्या हातात काय होतं. मृत्यूवर कोणाचेही नियंत्रण नाही. मला असं वटतं की मृत्यूबद्दल जास्त विचार करायला नाही पाहिजे. माझ्या समोर अनेक माझ्या जवळच्या मित्रांचं निधन झालं. मला जेव्हा जायचं असेल तेव्हा मी जाईल, पण जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी जिवंत राहिल....'