Entertainment News : बॉलीवूडचे (Bollywood) शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) काही हजार रुपयांसाठी मुलांना शिकवायची या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण ही खरी गोष्ट आहे. स्वत: श्वेता बच्चन हिने याबाबत खुलासा केला आहे. बीग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) एक पॉडकास्ट चालवते (Podcast). यावर ती आपल्या कुटुंबातील लोकांशी गप्पा मारते. यातल्या अनेक आठवणी ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअरही करते. या शोमध्येच श्वेता बच्चन हिने एक किस्सा सांगितला.
पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये नव्याने आपली आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये श्वेता आणि जया बच्चन यांनी पैशांसंबंधीत काही गोष्टी शेअर केल्या. महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी सांभाळवी याबाबत नव्याने श्वेता आणि जया बच्चनला प्रश्न विचारला.
अभिषेककडून पैसे उधार
नव्याने आपल्या आईला म्हणजे श्वेताला तुला कधी पैशांची कमतरता जाणवली का असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना श्वेताने हो असं उत्तर दिलं. शाळा आणि कॉलेजमध्ये असताना भाऊ अभिषेक बच्चनकडून (Abhishek Bachchan) पैसे उधार घ्यायची असं तीने सांगितलं.
किंडरगार्डनमध्ये केली नोकरी
इतकंच नाही तर लग्न झाल्यानंतर मी दिल्लीला शिफ्ट झाले. तिथे मी एका किंडरगार्टनमध्ये नोकरी करत असल्याचं श्वेताने सांगितलं. या शाळेत असिस्टंट टीचर म्हणून नोकरी करत होती आणि महिन्याचा पगार 3 हजार रुपये इतका असल्याचं तीने सांगितलं. पण ते पैसे कधीच खर्च केले नाहीत, सर्व पैसे बँकेत ठेवायचे असंही तीने सांगितलं. तुमच्याकडे 100 रुपये असोत 10 हजार असोत किंवा 1 करोड रुपये असतो, तुम्हाला पैशांचं नियोजन करता यायला हवं असा सल्लाही श्वेताने आपली मुलगी नव्याला दिला.