close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बॉलिवूड अभिनेत्रीला पुत्ररत्न; नाव जाहीर करत दिली गोड बातमी

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे

Updated: Sep 23, 2019, 06:49 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीला पुत्ररत्न; नाव जाहीर करत दिली गोड बातमी
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीपासूनच एक बॉलिवूड अभिनेत्री ही तिच्या गरोदरपणातील फोटोंमुळे अनेकांचं लक्ष वेधत होती. आयुष्यातील खास दिवसांमध्ये खास क्षण व्यतीत करणारी ही अभिनेत्री म्हणजे एमी जॅक्सन. 'एक दिवाना था' या चित्रपटातच्या निमित्ताने एमीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा या अभिनेत्रीने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

खुद्द एमीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सुरेख फोटो पोस्ट करत ही गोड बातमी दिली. या फोटोमध्ये एमीचं बाळही दिसत आहे. आई होण्याचा आनंद आणि शब्दांतही मांडता येणार नाही, अशा सर्व भावना तिच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. 

'या जगात तुझं स्वागत आहे... आंद्रेस....', असं लिहित एमीने तिच्या मुलाला सर्वांच्या भेटीला आणलं आहे. रुग्णालयातील हा फोटो पाहताना, एका आईला तिचं बाळ पाहून किती आनंद होतो, याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

मॉडेलिंगपासून हिंदी कलाविश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या एमीने फार कमी वेळातच आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. ज्यानंतर तिने फक्त हिंदीतच नव्हे तर, इतरही भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 

गेल्या काही काळापासून तिने खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत केलं. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने साखरपुडा करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. जॉर्ज असं तिच्या जोडीदाराचं नाव आहे. एमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही घडामोडींची चाहत्यांना कायमच माहिती दिली.