तब्बल २५ वर्षांनंतर 'ती' पुन्हा आमिरसोबत

मिस्टर परफेक्शनिस्टचा हटके अंदाज 

Updated: Jan 15, 2020, 05:48 PM IST
तब्बल २५ वर्षांनंतर 'ती' पुन्हा आमिरसोबत
तब्बल २५ वर्षांनंतर 'ती' पुन्हा आमिरसोबत

मुंबई : कलाविश्वात दर दिवशी बरेच कार्यक्रम पार पडत असतात. अशाच काही कार्यक्रमांपैकी निवडक ठिकाणी बी- टाऊनमधील काही प्रतिष्ठित चेहरेही पाहायला मिळतात. अशाच एका कार्यक्रमाचं आयोजन नुकतच मुंबईत करण्यात आलं होतं. यावेळी कलाविश्वातील काही नामवंतांची उपस्थिती पाहायला मिळाली. अनेकदा कार्यक्रमांना जाणं टाळणारा परफेक्शनिस्ट आमिर खान यानेसुद्धा यावेळी हजेरी लावली होती. 

आमिरसह त्याची पत्नी किरण राव हिसुद्धा यावेळी पाहायला मिळाली. पण, चर्चा झाली ती म्हणजे आमिरसोत दिसलेल्या एका दुसऱ्याच व्यक्तीची. जवळपास २५ वर्षांनंतर आमिर त्या व्यक्तीसोबत दिसला आणि चाहत्यांनाही हे पाहून आनंद झाला. 

परफेक्शनिस्ट आमिरसोबत दिसलेली ही व्यक्ती म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. 'रंगीला' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर तुफान गाजलेली ही जोडी अशा कार्यक्रमात एकत्र दिसणं त्यांच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच. यावेळी आमिरचा अंदाज पाहण्याजोगा होता. राखाडी रंगाचा टीशर्ट, चष्मा असा एकंदर लूक 'परफेक्ट' ठरत होता. तर, रंगीला गर्ल उर्मिलाने यावेळी फ्रिल्ड, लेयर्ड मॅक्सी ड्रेस घातला होता. ज्याता तिच्या गळ्यातील स्टोल आणखी उठावदार करत होता. 

width: 640px; height: 553px;

width: 640px; height: 624px;

आमिर आणि उर्मिला यांनी ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तो कार्यक्रम म्हणजे एखा खास चित्रपटाचं स्क्रीनिंग. गेल्याच वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांचा भाऊ बाबा आझमी 'मे रक्सम' नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगितलं होतं. शबाना आणि बाबा आझमी यांचे वडील ख्यातनाम कवी, लेखक कैफी आझमी यांच्या मूळ गावी म्हणजेच मिझवां येथे या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं. मंगळवारी कैफी आझमी यांच्या १०१व्या जयंती निमित्त मुंबईत या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठीच आमिरसह अनेक सेलिब्रिटींचींचीही उपस्थिती पाहायला मिळाली.