'उरी.....' फेम अभिनेत्याचं निधन

चित्रपटात साकारली होती ही भूमिका

Updated: Apr 9, 2019, 03:56 PM IST
'उरी.....' फेम अभिनेत्याचं निधन title=

मुंबई : अभिनेता विकी कौशल याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेते नवतेज हुंदल यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनाचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. आदित्य धर दिग्दर्शित 'उरी...' या चित्रपटात त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. हुंदल यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असं कुटुंब आहे. 

हुंदल यांची एक मुलगी एकता कपूरच्या ये है मोहोब्बते या मालिकेत मिहीका ही भूमिका साकारत आहे. हुंदल यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सिने आणि टेलिव्हिजन कलाकारांच्या तर्फे 'सिंटा'च्या सोशल मीडियावरुनही हुंदल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 

 
 
 
 

A post shared by  (@avantikahundaal) on

 
 
 
 

A post shared by (@avantikahundaal) on

विविध मालिका आणि चित्रपटांणध्ये नवतेज यांनी अभिनय केला आहे. भारत एक खोज हा कार्यक्रम, खलनायक, दुसरा कानून आणि इतरही काही चित्रपटांमधून ते झळकले होते. अभिनय क्षेत्रात काम करण्यासोबतच ते इतरांना अभिनय कलेचं प्रशिक्षणही द्यायचे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीतील काही आठवणींना उजाळाही देण्यात येत आहे.