close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जेटलींच्या निधनाविषयी दहा दिवसांपूर्वीच ठाऊक होतं, राखी सावंत बरळली

म्हणे माझ्याकडे दैवी शक्ती आहे...   

Updated: Aug 25, 2019, 03:21 PM IST
जेटलींच्या निधनाविषयी दहा दिवसांपूर्वीच ठाऊक होतं, राखी सावंत बरळली

मुंबई : प्रदीर्घ आजारानंतर माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. जेटली यांच्या निधनानंतर राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व हरपल्याची भावना अनेकांनीच व्यक्त केली. फक्त राजकारणच नव्हे, तर कला आणि क्रीडा  विश्वातूनही त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्यात आला. 

सोशल मीडियापासून ते इतरह सर्वच ठिकाणी अतिशय प्रभावी अशा या व्यक्तीच्या निधनाचा शोक व्य़क्त केला जात असताना, 'आयटम गर्ल' म्हणून चर्चेत असणारी राखी सावंत हिनेही तिची प्रतिक्रिया दिली. 

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून राखीने अरुण जेटली यांच्या निधनाची माहिती दिली. पण, या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा अक्षरश: बरळलीच आहे. 'मी एक आठवडा नव्हे, तर दहा दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की ते आपल्यात राहणार नाहीत. मला कधीकधी अशी स्वप्न पडतात, आधीच याविषयी कळतं....', असं म्हणत आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दिखावा ती या व्हिडिओतून करत आहे. 

 
 
 
 

 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

'सारा देश त्यांना (अरुण जेटली यांना) कायम स्मरणात ठेवेल. त्यांनी आजवर देशाच्या हितानेच विचार केला आहे, असं म्हणत या व्हिडिओच्या अखेरीस तिने आप्तजनांची काळजी घेण्याची विनंती केली आहे. राखीचा हा व्हिडिओ आणि त्यामध्ये तिने केलेलं वक्तव्य पाहता अनेकांनीच तिच्यावर आगपाखडही करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या कृतीच्या माध्यमातून वारंवार इतरांचं लक्ष वेधणाऱ्या राखीच्या वादग्रस्त सोशल मीडियाच्या पोस्ट म्हणजे य़ा व्हिडिओमुळे आणखी एक भर पडली आहे.