close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक

अरुण जेटली तिचे काका होते...

Updated: Aug 25, 2019, 02:18 PM IST
अभिनय क्षेत्रातील अरुण जेटलींची भाचीही त्यांच्या निधनाने भावुक

मुंबई : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. जेटलींच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही जेटलींच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे. अरुण जेटलींची भाची आणि टेलिव्हिजन अभिनेत्री रिधी डोगराही जेटलींच्या जाण्याने शोक सागरात बुडाली आहे.

अरुण जेटली रिधीचे काका (फूफा) होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेटलींच्या निधनानंतर ट्विटरवर शोक व्यक्त केला. रिधीने पंतप्रधानांचं ट्विट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

याआधी २०१७ मध्ये रिधीने अरुण जेटलींच्या वाढदिवशी त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करत तिने त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सदिच्छाही दिल्या होत्या.

अभिनेत्री रिधी डोगरा 'वो अपना सा', 'सावित्री एक प्रेम कहानी', 'मर्यादा लेकिन कब तक' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.