निधनानंतर उघडलं RD Burman यांच्या बँकेचं लॉकर; समोरचं दृश्य पाहून सगळेच हैराण

प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं.   

Updated: Jun 27, 2022, 01:30 PM IST
निधनानंतर उघडलं RD Burman यांच्या बँकेचं लॉकर; समोरचं दृश्य पाहून सगळेच हैराण  title=
bollywood RD Burman music bank account asha bhosle

मुंबई : काळाच्याही पुढे जाऊन चित्रपटांना संगीत देणाऱ्या संगीतकार आणि गायक आरडी बर्मन (RD Burman) यांनी 27 जून याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. पंचम, अशी त्यांची कलाविश्वातील ओळख. (bollywood RD Burman music bank account asha bhosle)

आरडींनी संगीतबद्ध केलेली कैक गाणी आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेतात. अशा या संगीतकाराच्या खासगी आयुष्याच्याही बऱ्याच चर्चा झाल्या. असं म्हणतात की त्यांच्या निधनानंतर पत्नी- गायिका आशा भोसले आणइ त्यांचे सेक्रेटरी भरत यांच्यात मोठा वादही झाला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. 

संपत्तीचा वाद 
आरडी बर्मन (RD Burman) यांच्या संपत्तीशिवाय त्यांच्या बँक लॉकरवरूनही वाद झाले. अनेकांनाच वाटत होतं की त्यांच्या बँकेच्या लॉकरमध्ये बरेच दागदागिने असावेत. कारण ठरत होतं, ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा राजेशाही थाट. 

सूत्रांकडून मिळालेल्या आणि बऱ्याच चर्चेत असणाऱ्या माहितीनुसार पंचमदांच्या निधनानंतर बँकेनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबासमोर लॉकर उघडलं. ही गोष्ट साधारण 1994 ची आहे. जेव्हा बँकेकडून आरडींची पत्नी, सेक्रेटरी आणि इतर कुटुंबीयांना बोलवून सर्वांसमोर लॉकर उघडलं गेलं. 

लॉकर उघडलं त्या क्षणी समोर असणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यात फक्त 5 रुपये होते. आरडींच्या बँक लॉकरमध्ये इतकंच काय ते का सापडलं या प्रश्नाचं उत्तर मात्र समोर येऊ शकलं नाही. 

वयाच्या 9 व्या वर्षापासून संगीत दिग्दर्शनात स्वारस्य दाखवणाऱ्या या कलाकारनं भारतीय चित्रपट संगीताला जागतिक संगीताशी एकरुप केलं आणि एका नव्या पर्वाची सुरुवात केली. किशोर कुमार यांच्याकडून त्यांनी बरीच गाणी गाऊन घेतली होती.