सलमानच्या कुटुंबाशी जुळणार होती आलियाच्या कुटुंबाची सोयरिक; पण...

त्यांचं नातं मात्र भक्कम पायावर उभं होतं.   

Updated: Feb 1, 2022, 01:00 PM IST
सलमानच्या कुटुंबाशी जुळणार होती आलियाच्या कुटुंबाची सोयरिक; पण...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड कलाकारांचे चित्रपट जितके चर्चेत नसतात तितकं या कलाकारांचं खासगी आयुष्य चर्चेत असतं. किंबहुना कुतूहल त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला सोशल मीडिया आणि अनेक माध्यमांच्या उपलब्धतेमुळं सेलिब्रिटींची जीवनशैली आपल्यापर्यंत पोहोचत आहे. 

पण, तुम्हाला माहितीये का 90 च्या दशकात असे अनेक सेलिब्रिटी होते, ज्यांच्या नात्याची चर्चा कमी झाली, पण त्यांचं नातं मात्र भक्कम पायावर उभं होतं. 

अशीच सेलिब्रिटी जोडी म्हणजे, अभिनेता सोहेल खान आणि अभिनेत्री पूजा भट्ट. 

सलमान खानचा भाऊ, एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीतून सोहेलसोबतच्या नात्याबाबत पूजानं वक्तव्य केलं होतं. 

सोहलसोबतचं लग्नं, त्याच्यासोबतचं नातं, त्याच्या भावंडांशी असणारं नातं आणि सलमानसोबत असणारा वाद या साऱ्यावर ती बोलली होती. 

तेव्हा पूजा आणि सोहेल रिलेशनशिपमध्ये होते. या नात्याबाबत मुलाखतीत पूजा म्हणालेली, 'मी त्याच्या कुटुंबासमवेत अगदी सहजपणे वावरते. ते सगळे फार छान आहेत. मी त्या सर्वांचाच आदर करते. कारण तिथे तुमच्यावर प्रश्न उपस्थित करणारं कुणी नसतं. 

मी जशी आहे, तशीच ते स्वीकारतात. प्रत्येक व्यक्तीशी असणाऱ्या माझ्या नात्यामुळं ते मला पसंत करतात. ते मला कुटुंबासारखेच आहेत.'

सोहेलच्या वडिलांशीही आपलं चांगलं नातं असल्याचं ती म्हणाली होती. त्यावेळी पूजाची नुकतीच अरबाजशी भेट झाली होती. शिवाय सलमानसोबत सुरुवातीला असणारा वाद मावळला असल्याचं सांगत आम्ही सगळे मिळून एक कुटुंबच आहे असंही ती म्हणाली होती. 

लग्नाबद्दल काय म्हणालेली पूजा? 
सोहेलसोबतचं पूजाचं नातं इतकं पुढे गेलेलं की ती लग्नाच्या तयारीच्या विचारात होती. अर्थात लग्न करायचंय, पण सोहेल सध्या त्याच्या कारकिर्दीच्या महत्त्वाच्या वळणावर आहे. 

लग्नाचं ठिकाण, खाद्यपदार्थ ठरवण्याआधी मलाही आणखी दोन- तीन वर्षे चित्रपट साकारायचे आहेत, असं ती म्हणाली होती. 

विश्वास, आदर आणि समजुतदारपणाच्या बळावर उभं असणारं हे नातं, पुढे जाऊन नेमकं कोणत्या वळणावर आलं कळेना. या मुलाखतीनंतर सोहेलनं लग्न केलं. पण, ते पूजाशी नाही. 

1998 मध्ये सोहेलनं सीमा खान हिच्याशी लग्नगाठ बांधली तर, 2003 मध्ये पूजानं मनिष मखिजा याच्याशी लग्न केलं. पण ही दोघंही आता त्यांच्या जोडीदारांपासून विभक्त आहेत.